मानव संसाधन मंत्रालय नाही तर शिक्षण मंत्रालय

1 min read

मानव संसाधन मंत्रालय नाही तर शिक्षण मंत्रालय

मोदी सरकारचा निर्णय

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच मोदी सरकारने नवीन शिक्षण धोरणाला मान्यताही दिली आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने मंत्रालयाचे सद्य नावे बदलून शिक्षण मंत्रालयात बदल करण्याचा प्रस्ताव दिला होता. मोदींच्या मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यासह नवीन शैक्षणिक धोरणालाही मान्यता देण्यात आली. मानव संसाधन विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक हे आहेत.

मानव संसाधन विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक

शिक्षण मंत्रालयाने उच्च शिक्षणासाठी एक नियामक संस्था 'राष्ट्रीय उच्च शिक्षण नियामक प्राधिकरण (एनएचईआरए) किंवा भारत उच्च शिक्षण आयोग' ची स्थापना केली आहे . राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये तयार केले गेले आणि 1992 मध्ये काही बदल करण्यात आले. तीन दशकांनंतरही यात कोणतेही मोठे बदल झाले नाहीत.