मनसे वर्धापण दिनानिमित्त "करोना जनजागरण"

1 min read

मनसे वर्धापण दिनानिमित्त "करोना जनजागरण"

मांसाहार वर्ज्य करा- डॉ भिकाणे

करोना विषाणू मानवात कुठून आला याचा कुठलाही शोध अद्याप लागला नसल्यामुळे सर्वसाधारण पणे मांसाहार वर्ज्य करावे असे प्रतिपादन मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी आनंदवाडी (अहमदपूर) येथे मनसे वर्धापनदिना निमित्त घेतलेल्या "करोना जनजागरण" या कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दामोदर गव्हाणे, वैद्यकीय अधिकारी बालाजी देवंगरे, सरपंच माधव चलमले,मनसे तालुकाध्यक्ष सुकेश गुरमे, मनवीसे प्रसिद्धीप्रमुख यश भिकाणे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ भिकाणे म्हणाले की चीनच्या वुहान शहरात सर्वप्रथम हा विषाणू मांस बाजारात काम करणाऱ्या लोकांमध्ये आढळून आला त्यामुळे तो एकतर त्या वातावरणात वाढला असावा. त्याप्रकारच्या मांसभक्षणातून मनुष्यात आला असावा त्यामुळे जोपर्यंत निश्चित कारणांचा शोध लागत नाही तोपर्यंत मांसाहार टाळलेले चांगले. तसेच हात सदोदित धुणे, हात तोंडाला न लावणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, खोकला आल्यावर टिशु पेपर वापरणे या बाबी अंमलात आणाव्यात. सोबतच रक्तदाब, मधुमेह, दमा, टीबी, फुफुसाचे आजार, गरोदर स्त्रिया यांनी जास्त काळजी घ्यावी. अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्दी ,खोकला आल्याबरोबर डॉक्टराना दाखवावे. घरामध्ये बाकी व्यक्तीसोबत एक मीटर चे अंतर जोपासावे. गेल्या आठवड्यात जगभर थैमान घातलेल्या या आजाराने भारतात ही पाय पसरायला सुरुवात केल्यामुळे जनजागृती साठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे आणि याचा उत्पत्ती शोध वा उपचार अस्तित्वात नसल्यामुळे जनप्रबोधन गरजेचे आहे असेही मत डॉ भिकाणे यांनी शेवटी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर मरे यांनी तर आभारप्रदर्शन पियुष कोंडेकर यांनी केले.