राष्ट्रीय महामार्गावर मनसेचे 'झोपा काढो' आंदोलन, अभियंत्यालाच बसवले "खड्डयात"!

रस्ते दुरुस्ती चे दहा कोटी रूपये उचलून गुत्तेदार गायब- डॉ.भिकाणे

राष्ट्रीय महामार्गावर मनसेचे 'झोपा काढो' आंदोलन, अभियंत्यालाच बसवले "खड्डयात"!

लातूर: लातूर-नांदेड हा राष्ट्रीय महामार्गाची वाईट दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी. या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली चापोली येथे राष्ट्रीय महामार्गावर झोपा काढो आंदोलन करण्यात आले.
या रस्त्याच्या दुरुस्ती साठी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ.भिकाणे यांनी अहमदपूर येथे अगोदर निवेदन दिले, नंतर खड्ड्याला पुष्पहार घातला, अष्टामोड येथे रास्ता रोको केला, चाकूर येथे उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांसोबत राज्यमार्ग प्राधिकरण अभियंत्यांसोबत बैठकही घेतली. परंतु लेखी खोटे आश्वासने देणे, मुरूम व गिट्टी खड्डयांमध्ये टाकून काम चालू केल्याचा खोटा आव आणणे यापलीकडे प्राधिकरण ने काहीच केले नाही.
त्यामुळे या झोपलेल्या विभागाला जाग आणण्यासाठी मनसेने आज लातूर-नांदेड महामार्गावर झोपा काढो आंदोलन केले. काम चालू केल्याशिवाय रस्त्यावरून उठणार नाही. अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे तहसीलदार शिवानांद बिडवे यांनी मध्यस्थी करत प्राधिकरण अभियंत्याला पाचारण केले. दोन वेळेस खोटे लेखी दिल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांनी अभियंत्याला जबरदस्तीने खड्ड्यात बसवले व जोरदार घोषणाबाजी केली.
काम तात्काळ सुरू करतो व पूर्ण झाल्याशिवाय थांबवणार नाही. अश्या लेखी आश्वासनानंतर अभियंत्याला मनसेने खड्ड्यामधून उठू दिले. मनसे कार्यकर्त्यांनी उग्र स्वरूप धारण केल्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलीस निरीक्षक जयवंत चौहान यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
रस्ते दुरुस्ती चे दहा कोटी रूपये उचलून गुत्तेदार गायब- डॉ.भिकाणे
ज्या गुत्तेदार कंपनीने या कामासाठी दहा कोटी उचलले, तो गुत्तेदार हे काम करण्यास तयार नाही. काम चालू करण्याअगोदर राज्यमार्ग प्राधिकरणने एवढी रक्कम त्याला दिली कशी? असा प्रश्न डॉ भिकाणे यांनी उपस्थित करत हे भ्रष्टाचारी आहेत. असा आरोप केला व या रस्ते दुरुस्तीसाठी कितीही आंदोलने करावी लागली, कितीही गुन्हे दाखल झाले, तरीही थांबणार नाही. ही खात्रीही त्यांनी जनतेला दिली.
या आंदोलनाला तालुकाध्यक्ष निरंजन रेड्डी, कृषीतालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, जिल्हाप्रसिद्धिप्रमुख यश भिकाणे, जनार्धन इरलापल्ले, तुळशीदास माने, मारुती पाटील, शिवशंकर पाटिल ,बाबुराव शेवाळे ,बालाजी कासले अभंग वाघमारे,माने ,मारोती पाटिल ,रामेश्वर होनराव,शिवराज कोडबळे,अविनाश झांबरै,कृष्णा गिरी, ऋषी भालेराव ,दिपक पटणे ,किशोर मोरे ,नितीन फड,विठ्ठल शंकरे,विरभद्र गंगापुरे,बस्वराज स्वामी ,विक्की उळागडे,प्रदीप चाटे,निलेश पाटिल ,हणमंत शेवाळे ,मोतीराम कांबळे ,दगडु शेवाळे ,विठ्ठल पवार ,शाम मद्रेवार,बाळु पाटिल ,नरसिंग शेवाळे ,बबलु शेवाळे ,चांद मोमीन,संतोष गडदे आदी उपस्थित होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.