
प्रतिनिधी: कोरोना साथीच्या आजाराने जगात थैमान घातल आहे, महाराष्ट्रात ही कोरोनाचे काही रूग्ण आढळले आहेत. मनसेचा दरवर्षी ‘गुढीपाडवा’ मेळावा असतो. या मेळाव्याला राज ठाकरे यांच भाषण ऐकण्यासाठी महाराष्ट्रभरातून मनसैनिकांची, लोकांची मोठी गर्दी शिवतीर्थावर पाहायला मिळते. कोरोनाची साथ रोखायची असेल तर महत्वाच म्हणजे लोकांची गर्दी टाळली पाहिजे.
म्हणनूच या वर्षीचा गुढीपाडवा मेळावा आपण रद्द करत आहोत असे परिपत्रक पक्षाच्या वतीने काढून कळविण्यात आले.