मनसेचे एसबीआय बॅकेच्या व्यवस्थापकास निवेदन

1 min read

मनसेचे एसबीआय बॅकेच्या व्यवस्थापकास निवेदन

अन्यथा पुढील होणा-या परिणामांना शाखाधिकारी जबाबदार

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: स्टेट बँक ऑफ इंडिया सोनपेठ शाखेत ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोनपेठ तालुका व शहर शाखेच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.
सोनपेठ तालुक्यात राष्ट्रीयकृत एकच बँक आहे. दोन्ही बँकाचे विलणीकरण झाल्यामुळे ग्राहकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळेच निवेदनावरील पुढील प्रमुख मागण्यामध्ये नवीन खाते काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांसाठी एक नमुना अर्ज मराठीत तयार करून तो भिंतीवर लावावा व तो अर्ज बँकेतुनच ग्राहकांस देण्यात यावा. बँकेतील देवाण- घेवाण करण्यासाठी बँकेत पाच खिडक्याची व्यवस्था करण्यात यावी. सोनपेठ मध्ये सध्या बँकेचे दोन एटीएम मशीन आहेत, ते वाढवून चार मशीन बसविण्यात याव्यात . एटीएम मशीन मध्ये पैसे ठेवून २४ तास सुरू ठेवावे. कर्ज माफीच्या याद्या ज्या गावात लावल्या जात आहेत त्या मराठीत लावण्यात यावे. .अंध व अपंगासाठी बँकेत व्यवहार करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात यावी. सोनेतारण , होमलोन आणि विविध फॉर्म चे पेपर मराठीत करावेत. बँकेत पासबुक प्रिंट मशीन सुरू ठेवावी. सोनपेठ तालुक्यातील छोट्या व्यापारासाठी मुद्रा लोनचं वाटप करण्यात यावं.वरील दिलेल्या मागण्याची पुर्तता लवकर करण्यात यावी अन्यथा पुढील होणा-या परिणामांना शाखाधिकारी जबाबदार राहतील असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.या निवेदनावर तालुकाध्यक्ष नंदकिशोर रोडे, मनविसे तालुकाध्यक्ष मुन्ना बिराजदार , शहराध्यक्ष संदिप कांबळे ,गजानन देशपांडे , राम कांबळे , धुराजी लाकडे , विजय खेतरे , आमोल कांबळे , बापु कांबळे , प्रकाश संराडे , गणेश पांढरे , राजु माने , भागवत खरात, जितेंद्र कुक्कडे या सह आदीच्या स्वाक्ष-या आहेत.