मनुस्मृती आणि स्त्री

1 min read

मनुस्मृती आणि स्त्री

मनुस्मृती स्त्रीवर नेहमीच अन्याय करते अशी भुमिका मांडली जाते. मनुस्मृती मध्ये स्त्री विषयक काय भुमिका मांडली आहे ते देखील तपासले पाहिजे . एकदा वााचून निर्णय घ्यावा

मनुस्मृती आणि स्त्री ब भाग 6 चा पुढील भाग
मनुने आपल्या नियमावलीत स्त्रियांना काय स्थान दिले आहे. त्याची भुमिका त्याबाबत काय आहे हे तपासले पाहिजे. आपण प्रत्येक वेळा ईतिहास अथवा पुराण वाचताना एक चुक नेहमी करत असतो की, आजच्या संदर्भाला जोडत अथवा समोर ठेऊन ईतिहास अथवा पुराण वाचत असतो. पुराणातील अथवा ईतिहासातील मानवांना देवत्व बहाल करत त्यांच्याकडे बघण्याची वृत्ती देखील त्या पुराणातील व्यक्तीवर अन्याय करत असते. त्याकाळी नारी मुक्ती,समान दर्जा हे शब्द देखील अस्तित्वात नव्हते. हे लक्षात घेतले पाहिजे असो. मनुची स्त्रीबाबतची भुमिका काय आहे ते बघू.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः । । ३.५६ । ।

ज्या समाजात अथवा परीवारात स्त्रीयांचा आदर आणि सन्मान होतो. त्या ठिकाणी देवता आणि दिव्य गुणाचा वास असतो. जिथे असा सन्मान होत नाही अथवा अनादर केला जातो त्यांचे सगळे काम निष्फळ होतात. भलेही त्यांनी कितीही श्रेष्ठ कर्म केलेले असोत. स्त्रीयांचा अनादर करणा-या लोकांना कायम दुःखाचा सामना करावा लागतो.
शोचन्ति जामयो यत्र विनश्यत्याशु तत्कुलम् ।
न शोचन्ति तु यत्रैता वर्धते तद्धि सर्वदा । । ३.५७ ।
ज्या कुळातील स्त्रीया आपल्या पतीच्या भ्रष्ट आचरण, अत्याचार आणि व्यभिचार या दोषांनी पिडीत असतात त्या कुळाचा शिघ्र नाश ठरलेला असतो. आणि ज्या कुळातील स्त्रीया पुरूषाच्या उत्तम आचरणाने प्रसन्न राहतात त्या कुळाची सदासर्वकाळ वृध्दी होत राहते.

जामयो यानि गेहानि शपन्त्यप्रतिपूजिताः ।
तानि कृत्याहतानीव विनश्यन्ति समन्ततः । । ३.५८ । ।

अनादराच्या मुळे ज्या स्त्रीया पिडीत आणि दुःखी होऊन पती, माता- पिता, भाऊ, दिर आदी नात्याच्या व्यक्तीला दोष देत देतात तो परिवार असा संपतो जसे कोणी एकदाच त्या परिवारावर विष प्रयोग केला आहे.

तस्मादेताः सदा पूज्या भूषणाच्छादनाशनैः ।
भूतिकामैर्नरैर्नित्यं सत्करेषूत्सवेषु च । । ३.५९ ।

ऐश्वर्याची ईच्छा असलेल्या प्रत्येक मनुष्याला उत्सव सण अथवा गौरवाच्या वेळी आपल्या स्त्रियांच्या आभुषणाचा वस्त्राचा आणि भोजनाचा सन्मान करायला हवा.

स्त्रियां तु रोचमानायां सर्वं तद्रोचते कुलम् ।
तस्यां त्वरोचमानायां सर्वं एव न रोचते । । ३.६२ । ।

जो पुरूष आपली पत्नी प्रसन्न ठेऊ शकत नाही त्याचा पूर्ण परीवार अप्रसन्न आणि शोकग्रस्त असतो. पत्नी प्रसन्न तर परीवार प्रसन्न.
मातापितृभ्यां जामीभिर्भ्रात्रा पुत्रेण भार्यया ।
दुहित्रा दासवर्गेण विवादं न समाचरेत् । । ४.१८० । ।

एक समजदार पुरूष माता पिता आणि पत्नी सोबत वाद न घालता सामोपचाराने जगत असतो. याचा अर्थ आपल्या माता पिता आणि पत्नीसोबत वाद घालणारा व्यक्ती असंमजस असतो असाच होतो. पत्नी आणि मातेशी वाद घालू नये हे सुत्र मनुने सांगितले आहे.
**रजनार्थं महाभागाः पूजार्हा गृहदीप्तयः ।
स्त्रियः श्रियश्च गेहेषु न विशेषोऽस्ति कश्चन । । ९.२६ । ।
उत्पादनं अपत्यस्य जातस्य परिपालनम् ।
प्रत्यहं लोकयात्रायाः प्रत्यक्षं स्त्री निबन्धनम् । । ९.२७ । ।
अपत्यं धर्मकार्याणि शुश्रूषा रतिरुत्तमा ।
दाराधीनस्तथा स्वर्गः पितॄणां आत्मनश्च ह । । ९.२८ । । **

अपत्याला जन्म देऊन घराचा भाग्योदय करणारी स्त्री सन्मानाच्या योग्य असते. शोभा, लक्ष्मी आणि स्त्री यात कोणतेच अंतर नसते. स्त्री सर्वप्रकारचे सुख देणारी आहे. परोपकारी कार्य काय किंवा ज्येष्ठांची सेवा ही सगळी कार्य स्त्रीयांच्या अधीन असतात. ती कधी मातेच्या रूपात तर कधी पत्नी तर कधी आध्यात्मिक कार्यात सहभागी होऊन आयुष्याला सुखद बनवत असते. याचा अर्थच धार्मिक कार्यातील स्त्रीयांचा सहभाग आवश्यक आहे असाच होतो.
प्रजनार्थं स्त्रियः सृष्टाः संतानार्थं च मानवः ।
तस्मात्साधारणो धर्मः श्रुतौ पत्न्या सहोदितः । । ९.९६ । ।

पुरूष आणि स्त्री एक दुस-याशिवाय अपूर्ण आहेत. अगदी छोट्यातील छोट्या धार्मिक कार्य देखील पती आणि पत्नी यांना मिळूनच केले पाहीजे.
वरील दोन अध्यायातील दहा श्लोकात एकाही ठिकाणी मनु स्त्रीवर अन्याय करताना तिला विनिमयाची वस्तु माणताना अथवा तिला दासी समजताना दिसत नाही. तुळशीदासांच्या दोह्याचा दाखला देत मनुने स्त्री आणि शुद्र यांना ताडणाचे अधीकारी माणले असल्याचा दावा पोकळ आणि हेतुपूर्वक आहे असे वाटते. किंबहुना तसा एकही श्लोक मनुस्मृतीत आढळत नाही. निदान मी अभ्यालेल्या चार मनुस्मृतीत तरी अशा आशयाचा कोणताही श्लोक आढळत नाही. तुळशीदास यांनी तो दोहा मनुस्मृतीतील कोणत्या श्लोकाच्या आधारावर लिहिला हे तपासले असता तशा आशयाचा कोणताही श्लोक मनुस्मृतीत आढळून येत नाहीत. या दोह्याच्या पुष्ठ्यर्थ जे श्लोक क्रमांक दिले जातात तिथे ते श्लोक आढळतच नाहीत.
मनमुस्मृतीच्या नवव्या अध्यायातील तिस-या श्लोकाचा संदर्भ देत मनुने स्त्रियांना स्वातंत्र्य नाकारले असा दावा केला जातो. ‘ न स्त्री स्वातंत्र्यमर्हति ‘ हा एक शब्द घेत स्त्री गुलाम असल्याचे मनु सांगतो असा दावा केला जातो.
तो श्लोक जरा निट बघू
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।
रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातंत्र्यमर्हति।।

या श्लोकाचा अर्थ मोठ्या खुबीने सांगितला गेला. मला वाटत ही चलाखी तत्कालीन स्वार्थी आणि आपले महत्व पुरूषी वर्चस्व ठेऊ पाहणा-या वर्गानेच केली असावी. दोष मनुच्या माथी मारला गेला.
बघा कसा सांगितला जातो तो अर्थ
कुमारवयात स्त्री चे रक्षण पिता करतो. पती यौवनात रक्षण करतो. वृध्दावस्थेत मुलगा सांभाळतो. स्त्रिला कोणत्याच वयात स्वातंत्र्य नाही. असा अर्थ सांगितल्यावर स्त्री चार भिंतीत बंदीस्त करण्याची ईच्छा पूर्ण होऊन जाते.
पण या श्लोकाचा अर्थ काय ते तपासलेच पाहिजे.
ती स्वतंत्र्य नाही असा एकट्या ओळाचा अर्थ घेण्यापेक्षा पुर्वाधार्तील अर्थ स्पष्ट झाला पाहिजे. ती सदैव सुरक्षीत असावी याची काळजी घेतली पाहिजे असा त्याचा अर्थ. आपल्या सोयीने अर्थ लावणा-या वर्गाने घात गेला आणि दोष मनुस्मृतीच्या माथी बसला. जिथे ऑल टाईम प्रोटेक्टेड असा अर्थ येणे अपेक्षीत होते. तिथे सदा सर्वकाळ बंधनात असा आला. आणि जबाबादारीला उपकाराचे स्वरूप दिले गेले. स्त्री मोकळी पडलेली नाही तर ती समाजतल्या प्रत्येक घटकांची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचे निर्वहन करण्यासाठी मनु कठोर नियमकरतो आहे.
स्त्रियं स्पृशेददेशे यः स्पृष्टो वा मर्षयेत्तया ।

परस्परस्यानुमते सर्वं संग्रहणं स्मृतम् । । ८.३५८ । ।
अब्राह्मणः संग्रहणे प्राणान्तं दण्डं अर्हति ।
चतुर्णां अपि वर्णानां दारा रक्ष्यतमाः सदा । । ८.३५९ । ।

जो कोणी परक्या स्त्रीला अनुचित स्थानी स्पर्ष करील अथवा स्त्रीने केलेला स्पर्ष सहन करील तरी तो विनयभंग आहे. चारवर्णातील कोणतीही स्त्री असेल तर अशा पुरूषास देहांत प्राय़श्चित्त द्यावे स्त्रीचे सदैव रक्षण झाले पाहिजे.

परदाराभिमर्शेषु प्रवृत्तान्नॄन्महीपतिः ।
उद्वेजनकरैर्दण्डैश्छिन्नयित्वा प्रवासयेत् । । ८.३५२ । ।

परस्त्रीशी व्यभिचार करणा-या पुरूषाला राजाने जन्मभर आठवण राहील अशी सिक्षा देऊन म्हणजे हात पाय तोडून हद्दपार करावे.
संमतीने संबंध आणि बळजबरीने संबंध यात मनुने भेद केला आहे. संमतीने संबंध ठेवल्यास दंडाची शिक्षा सांगितली आहे. तर बळजबरीला कठोर शिक्षा सांगितल्या आहेत. एकुणच स्त्रियांचे रक्षण याकडे मनू गांभिर्याने बघतो हे आपल्या लक्षात येईल. यात एक गोष्ट स्पष्ट करावी वाटते की मनु स्त्रीविषयक अपराधांना वर्णाच्या कसोटीवर शिक्षा देत नाही हे अनेक श्लोकात दिसते आहे. कांही ठिकाणी परस्पर संमतीने झालेल्या स्त्रीविषय अपराधात वर्णाप्रमाणे शिक्षा दिसते. यात कांहीतरी गडबड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण यातील कांही श्लोक परस्पर विरोधी विधान आहेत असे वाटते.
मनु स्त्रीला विनियामाचे साधन माणतो असा एक निष्कर्ष मनुविरोधक काढतात. त्याच्या खंडनार्थ कांही श्लोक मुद्दाम येथे देत आहे.

न कन्यायाः पिता विद्वान्गृह्णीयाच्छुल्कं अण्वपि ।
गृह्णञ् शुल्कं हि लोभेन स्यान्नरोऽपत्यविक्रयी । । ३.५१ । ।

कन्यादानाच्यावेळी वरापासून धन घेणे हे मोठे पाप आहे. असे जाणणा-या पित्याने वरापासून कधीही थोडेसुध्दा धन घेऊ नये. कारण लोभाने द्रव्य घेणारा मणुष्य आपल्याच अपत्याची विक्री करणारा होते. अपत्याची विक्री करणे हे महापाप आहे.
मनु एवढ्यावरच थांबत नाही तर तो पुढे लिहितो.

स्त्रीधनानि तु ये मोहादुपजीवन्ति बान्धवाः ।
नारी यानानि वस्त्रं वा ते पापा यान्त्यधोगतिम् । । ३.५२ । ।

पिता, भ्राता, पती यानी स्त्रीला दिलेले वस्त्रे, अलकार वाहने ईत्यादी धन हे स्त्री धन आहे. त्यावर केवळ तिचाच हक्क आहे. या स्त्री धनाचा जे आप्त मोहवश होऊन स्वतःसाठी उपयोग करतात ते नरकात जातात.
वरपक्षाने आपण होऊन कांही धन वधुपक्षाला दिले तर काय करावे हे देखील मनूने सांगून ठेवले आहे. मनू सांगतो.

यासां नाददते शुल्कं ज्ञातयो न स विक्रयः ।
अर्हणं तत्कुमारीणां आनृशंस्यं च केवलम् । । ३.५४ । ।

वरपक्षाने कांही आपणहोऊन वधूपक्षाला दिलेले द्रव्य वधूच्या आप्तांनी स्वतःच्या उपयोगाला नआणता ते वधुला दिल्यास तो विक्रय न होता वधुचा सन्मान होतो.
स्त्री धन ही संकल्पनाच स्त्रियांना सन्मान व सुरक्षा देणारी होती. ज्याचा मनु जाणिवपुर्वक उल्लेख करताना दिसतो.
एक स्त्री जशी मुलगी, पत्नी आई असेत. तर एक पुरूष मुलगा, पती आणि पिता असतो हे कसे विसरता येईल. सगळ्याच भुमिकात तो स्त्रिच्या सन्मानाची रक्षा करणारा असला पाहिजे हिच ती धारणा पण पुरूषी मानसिकतेने तो अर्थच बदलून टाकला आणि बदनाम झाला तो हिंदू धर्म