मराठा आरक्षण सरकारने दिलं तर ठीक, अन्यथा राजकारणाला रामराम- खा.उदयनराजे भोसले

1 min read

मराठा आरक्षण सरकारने दिलं तर ठीक, अन्यथा राजकारणाला रामराम- खा.उदयनराजे भोसले

कोणत्याही पक्षाचे लेबल मला लावू नका आणि श्रेय वाद घेऊ नका. “माझी बांधिलकी लोकांशी आहे, पक्षाशी नाही.

RNO/सातारा: भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षण सरकारने दिले तर ठीक, अन्यथा राजकारणाला रामराम करणार आणि राजीनामा देऊन टाकणार असं उदयनराजे म्हणाले. सर्वांना न्याय मिळत असताना मराठा समाजाने वंचित का राहावं? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणप्रश्नी खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, कोणत्याही पक्षाचे लेबल मला लावू नका आणि श्रेय वाद घेऊ नका. “माझी बांधिलकी लोकांशी आहे, पक्षाशी नाही. कोणताही पक्ष हा लोकांच्या जीवावर असतो.

जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मी कधीच करत नाही, मग ते कोणीही असो. आघाडी तिघाडी मला माहित नसून गोरगरिबांना धारेवर का धरले? याच उत्तर द्या असा सवाल पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर उद्रेक होणार आणि याला जबाबदार कोण? त्यामुळे सरकारने वेळीच यावर तोडगा काढून मराठा समाजाला न्याय द्यावा. अशी मागणी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.