आरक्षणास स्थगिती मिळाल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

1 min read

आरक्षणास स्थगिती मिळाल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगितीही देतानाच हा विषय घटनापीठाकडे वर्ग करण्याच्या निकालानंतर चाकूर तहसीलमध्ये एका निराश तरुणाने विषारी द्रव प्राशनकरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

लातूर : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगितीही देतानाच हा विषय घटनापीठाकडे वर्ग करण्याच्या निकालानंतर चाकूर तहसीलमध्ये एका निराश तरुणाने विषारी द्रव प्राशनकरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
किशोर गिरीधर कदम (वय २८) असे सदर तरुणाचे नाव असून तो बोरगांव ( ता. चाकूर) येथील रहिवासी असून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. त्याने तलाठी आणि पीएमटी यासाठी परीक्षाही दिल्याचे सांगण्यात येते. अभ्यासासोबतच आरक्षण मिळाल्यास त्याचा आपल्याला लाभ मिळेल असा आशावाद त्याला होता. आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्याने तो निराश झाला. त्याने सोशल मीडियावरून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले व चाकूर तहसील कार्यालयासमोर विषारी द्रव प्राशन केले. चाकूर ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले व पुढील उपचारासाठी लातूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. किशोरचे बीएड पूर्ण झाले असून गेल्या काही वर्षांपासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे....