परभणी : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कडक पावले उचलली जात आहेत. आज सोमवारी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयामध्ये ५० व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्ती लग्नकार्यात आढळून आल्याने जिंतूर न.प.च्या वतीने २५ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला.सदरील रक्कम तात्काळ वसूल करण्यात आली.
न.प.चे स्वच्छता निरीक्षक सालेय चाऊस, गुलाब साबळे व इतर कर्मचार्यांनी ही कारवाई केली. यामुळे शहरातील इतर मंगल कार्यालयांच्या मालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी हातात दंडुका घेऊन शहरातील मुख्य बाजारपेठेत पायी फिरून विनामास्क व्यापार्यांवर दंडात्मक कार्यवाही केली. यामुळे व्यापार्यांची तारांबळ उडाली. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कठोर भूमिका घेऊन तहसीलदार, नगर परिषदेला आदेश देऊन विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.