मंगल कार्यालयाला ठोठावला ५० हजाराचा दंड

नियमाचे उल्लंघन केल्यामुळे मंगल कार्यालयावर ही पहिलीच दंडात्मक कार्यवाही

मंगल कार्यालयाला ठोठावला ५० हजाराचा दंड

परभणी : कोव्हिड-१९ साथीची दुसरी लाट आल्यानंतर प्रशासनाने अनेक निर्बंध पून्हा नव्याने लागू केले आहेत. शाळा, आठवडीबाजारही बंद केले आहेत. या पूर्वी मंगल कार्यालय आणि कोचिंग क्लासेसनाही सुचना देण्यात आल्या होत्या. परंतु या न पाळल्यामुळे शहरातील एका मंगल कार्यालयाला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

शहरातील धाररोडवरील गोल्डन फंक्शन हॉल या मंगल कार्यालयाला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सुमारे ३ ते ४ हजार नागरिकांची या कार्यालयातील कार्यक्रमाला गर्दी होती.दि. १७ फेब्रुवारी रोजी या मंगल कार्यालयात पीएफआय या संघटनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गर्दी जास्त असल्यामुळे या गोल्डन फंक्शन हॉलचे मालक मुदस्सीर जहीर अहेमद यांना हा दंड ठोठावला आहे. त्यानुसार हा दंड ठोठावला आहे. प्रशासन कोरोना वरील प्रतिबंधात्मक उपायायोजना करण्यासाठी सरसावले आहे.

मंगल कार्यालय व कोचिंग क्लासेस सारख्या संस्थांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी इंन्सीडेंट कमांडर म्हणून नियुक्त केले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांनाही बंदी घातली आहे. दरम्यान, नियमाचे उल्लंघन केल्यामुळे मंगल कार्यालयावर ही पहिलीच दंडात्मक कार्यवाही झाली आहे. यानंतरही असा प्रकार घडल्यास मंगल कार्यालय काही दिवसाकरीता सील करण्यात येतणार आहे. यापुढेही मंगल कार्यालय व कोचिंग क्लासेसवरती प्रशासनाचे बारीक लक्ष राहणार आहे. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यासाठी कसोसीने प्रयत्न केले जात आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.