माझा देवावर आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास –रिया चक्रवर्ती

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के.के. सिंह यांनी केलेल्या आरोपाविरोधात रियाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

माझा देवावर आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास –रिया चक्रवर्ती

मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्तीने अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के.के. सिंह यांनी केलेल्या आरोपाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. रियाने नुकताच एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, माझा देवावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय नक्की मिळेल. माझ्याबद्दल प्रसारमाध्यमात खूप वाईट गोष्टी पसरवल्या जात आहेत. पण माझ्या वकीलांनी मला याबाबत भाष्य करण्यास मनाई केली आहे. हे प्रकरण कोर्टात आहे. याप्रकरणाचे सत्य लवकरच समोर येईल, सत्यमेव जयते!
सुशांत सिंह राजपूतचे वडील के.के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी रिया सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे. रियाने स्वतःच्या बचावासाठी देशातील सर्वात मोठ्या वकिलांपैकी एक वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांना हायर केलं आहे. या घडामोडी सुरु असतानाच रियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिनं माझा देवावर आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती

सुशांतच्या वडिलांची तक्रार
सुशांत सिंह राजपूतचे वडील के.के. सिंह यांनी केलेल्या तक्रारीत रिया चक्रवर्तीसह इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरिंडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात फसवूणक, दगाबाजी, ओलीस ठेवणे आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. सुशांतच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "या कटात रिया आणि तिच्या कुटुंबायांनी माझ्या मुलासोबत जवळीक वाढवली होती आणि हे सगळेच माझ्या मुलाच्या प्रत्येक बाबत हस्तक्षेप करायला लागले. तसंच सुशांत ज्या घरात राहत होता तिथे भूत-प्रेत असल्याचं सांगत त्याला ते सोडायला लावलं."


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.