बिबी का मकबऱ्यासमोर उत्खननात सापडले मध्ययुगातील अवशेष

आणखीन अवशेष सापडण्याची शक्यता...

बिबी का मकबऱ्यासमोर उत्खननात सापडले मध्ययुगातील अवशेष

औरंगाबाद: ऐतिहासिक बिबीका मकबरा परिसरात बांधकाम पुरातत्व विभागाने हाती घेतले आहे. मकबऱ्यासमोरील उंचवट्याचे उत्खनन सुरु असून याठिकाणी मकबरा बांधकाम काळातील स्नानगृह, शौचालयासारखा दगडी, चुन्याचे बांधकाम असलेला पाया, अवशेष आढळले आहेत. परिसरातील उत्खननाचे काम अजूनही सुरुच असून या मलब्याखाली आणखी काय दडलंय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद सर्कल कार्यालयाकडून मकबरासमोरील उजव्या बाजूला असलेल्या उंचवट्यावर ४० मीटर बाय ४० मीटर परिसरात स्ट्रेन्चची आखणी १४ सप्टेंबरला करून उत्खननाचा शुभारंभ करण्यात आला. दररोज चार ते दहा जण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खोदकाम करत आहेत. समोरच्या भागात दोन स्ट्रेन्चमध्ये चार ते सहा फूट खोलपर्यंत उत्खनन करून मलबा हटवला गेल्याने विटा, चुना, दगडी मध्ययुगीन बांधकामाचे अवशेष उघडे पडले आहेत. पावसामुळे कधी खोदकाम होते कधी थांबत आहे. या सापडलेल्या बांधकामांना लागून पुढे काय अवशेष सापडतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

बिबीका मकबरा ही ताजमहालची प्रतिकृती
बिबी का मकबऱ्याची निर्मिती मुघल बादशहा औरंगजेबाने सतराव्या शतकाच्या अखेरीस केली होती. इतिहासकारांच्या मते, या मकबऱ्याचे बांधकाम मुघल बादशाह औरंगजेबाचे पुत्र आजम शाह यांनी आई दिलरस बानो बेगम यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ केले होते. त्यांना राबिया-उद-दौरानी नावाने ओळखले जात. विशेष म्हणजे ताजमहालच्या धर्तीवर याचे बांधकाम करण्यात आले आहे. मुघल काळात ही वास्तू औरंगाबाद शहराचे मध्यवर्ती ठिकाण होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.