मोदी आणि कमला हॅरिस यांची भेट,दहशतवाद संघटने बद्दल चर्चा

कमला हॅरिसयांनी दहशतवाद विरोध करत पाकिस्तानला इशारा

मोदी आणि कमला हॅरिस यांची भेट,दहशतवाद संघटने बद्दल चर्चा

आंतरराष्ट्रीय: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसापासून अमेरिका दौऱ्यावर आहेत.मोदींच्या द्विपक्षीय भेटीत दुसरी बैठक अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासोबत झाली. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी कोरोनाच्या महामारीमध्ये अमेरिकेकडून मिळालेल्या सहकार्यासाठी मनापासून आभार व्यक्त केले. दोन्ही नेत्यांमध्ये सुरुवातीला व्हाईट हाऊसमध्ये चर्चा झाली आणि नंतर शिष्टमंडळ स्तरावरील बैठकीला उपस्थिती लावली. पंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. त्याचवेळी, पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीदरम्यान अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनीही दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शुक्रवारी झालेल्या पहिल्या बैठकीत अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी पाकिस्तानमधील दहशतवादाच्या भूमिकेचा उल्लेख केला आणि देशाला दहशतवादी गटांचे समर्थन थांबवण्यास सांगितले आहे. कमला हॅरिस यांनी स्पष्टपणे सांगितले की पाकिस्तानी भूमीवर अनेक दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. हॅरिस यांनी पाकिस्तानला या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यास सांगितले आहे त्यामुळे त्याचा अमेरिका आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम होणार नाही.

बैठकीपूर्वी दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे प्रसारमाध्यमांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी कोविड साथीच्या काळात कमला हॅरिस यांच्या मदतीची आठवण करून दिली. “उपराष्ट्रपती झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये अनेक चर्चा झाल्या आहेत. भारत कोविडशी लढत असताना एकदा संभाषण झाले होते. त्यावेळी कमला हॅरिस यांचे एकतेच शब्द मला आठवले. अमेरिकन सरकार आणि कंपन्या आणि परदेशातील भारतीय समुदाय कोविड महामारीशी अत्यंत कठीण लढाईत खूप मदत करत आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि हॅरिस यांनी स्वतः अशा वेळी पदभार स्वीकारला जेव्हा संपूर्ण जगाला एक अतिशय कठीण आव्हान भेडसावत होते आणि अतिशय कमी कालावधीत त्यांनी कोविड किंवा हवामान बदलांसारख्या आपत्तींसोबत लढा देत यश मिळवले,” असे पंतप्रधानांनी म्हटले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.