मेघना बोर्डीकरांचा सीएएला विरोध?

1 min read

मेघना बोर्डीकरांचा सीएएला विरोध?

भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक असलेल्या नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी सीएए ला विरोध करण्याचा हा निर्णय घेतल्याने मेघना या अडचणीत येऊ शकतात.

भारतीय जनता पक्षाच्या महाभरतीत आलेल्या मेघना बोर्डीकर यांचा ताबा असलेल्या सेलू नगरपालीकेने केंद्र सरकारने आणलेल्या सीएए आणि एनआरसी च्या विरोधात ठराव घेत या प्रसातावाला रद्द करण्याची मागणी केली आहे. सेलू नगर पालीकेत भाजपची सत्ता आहे हे विशेष.
caa-selu
शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी मात्र या ठरावाच्या विरोधात राहण्याची भुमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त आहे. एकीकडे भाजपचे नगरसेवक सीएए ला विरोध करत आहेत आणि सेना नगरसेवक गप्प पाहत आहेत. सेलू नप ही मेघना बोर्डीकर यांच्या ताब्यात आहे. तर मेघना बोर्डीकर या भारतीय जनता पक्षाच्या जिंतूर विधानसभा मतदार संघातील सदस्य आहेत.
सेलू नगरपालिकेने मात्र या कायद्याच्या विरोधामध्ये ठराव घेत तो पारित केला आहे. त्यामुळे या निर्णयाची चर्चा जिल्हाभर रंगत आहे. भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक असलेल्या नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी हा निर्णय घेतल्याने मेघना अडचणीत येऊ शकतात.

परभणीच्या सेलू नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा २८ फेब्रुवारी रोजी पार पडली. ज्यात स्वतः भाजपचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी सभागृहात नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९ (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आण लोकसंख्या नोंदवहीला(एनपीआर) विरोध असल्याचा विषय मांडला ज्यावर सर्व सदस्यांनी चर्चा केली आणि शेवटी नगरसेवक अब्दुल वहिद हमीद यांनी अनुमोदन दिले आणि सभागृहात उपस्थित असलेल्या २८ पैकी २६ नगरसेवकांनी या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. केवळ शिवसेनेचे नगरसेवक मनीष कदम आणि आशा दिशागत यांनी पक्षाची भूमिका पक्षश्रेष्ठींना विचारुन मग आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगून स्वाक्षऱ्या केल्या नाहीत. महत्त्वाचे म्हणजे हा ठराव घेतल्याचे अत्यंत गुप्त ठेवण्यात आले होते.