एचएएआरसी तर्फे वाणटाकळी तांडा येथील १२० महिलांचे मासिक पाळी समुपदेशन

महिला आरोग्य संवाद मेळाव्याचे आयोजन एचएआरसी संस्था व वाणटाकळी तांडा ग्रामस्थांच्या पुढाकारातून करण्यात आले

एचएएआरसी तर्फे वाणटाकळी तांडा येथील १२० महिलांचे मासिक पाळी समुपदेशन

परभणी : होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थे तर्फे वाणटाकळी तांडा ता. परळी येथे महिला व किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी समुपदेशन व महिलांच्या आरोग्य समस्याविषयी प्रबोधनात्मक कार्यक्रम श्रीराम सार्वजनिक वाचनालय हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जवळपास १२० महिलांची उपस्थिती होती.

एचएआरसी संस्थे तर्फे मागील २०१९ पासून आजवर संपूर्ण परभणी, हिंगोली, वाशीम व बीड जिल्ह्यातील २०० शाळेतील १५००० किशोरवयीन मुलींचे मासिक पाळी विषयी समुपदेशन करून ९००० गरजू आर्थिक दृष्ट्या दूरबल मुलींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.

वर्षभर महिला आरोग्य संवाद मेळाव्याचे आयोजन
एचएआरसी संस्थे तर्फे येत्या वर्षभरात संपूर्ण जिल्हात महिलांसाठी विशेषतः पालकांसाठी मासिक पाळी व्यवस्थापन आणि पाळीशी संबंधित विविध समस्यांवर ग्रामीण भागात महिला आरोग्य संवाद मेळाव्याचे आयोजन करून महिलांशी संवाद साधणार आहेत. हा सर्व उपक्रम शासनाकडून कोणतेही अनुदान किंवा आर्थिक सहाय्य न घेता लोकसहभागातून करणार आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून आज महिला आरोग्य संवाद मेळाव्याचे आयोजन एचएआरसी संस्था व वाणटाकळी तांडा ग्रामस्थांच्या पुढाकारातून करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ सौ आशा चांडक यांनी उपस्थित स्त्रियांशी मासिक पाळी व्यवस्थापन विषयी संवाद साधतांना मासिक पाळीत घेण्याची स्वच्छतेची काळजी सोबत घरगुती सॅनिटरी पॅड तयार करण्याचे प्रात्यक्षिक द्वारे मार्गदर्शन केले सोबत त्याची विल्हेवाट विषयी मार्गदर्शन केले.तसेच उपस्थित महिलांशी विविध प्रश्नोत्तरे द्वारे पाळीतील अनियमितता, पाळीतील अतिरक्तस्राव, वयाच्या ४० शी नंतर रजोनिवृत्ती, स्तनातील गाठीचे स्वयंतपासणी, पीसीओएस आदी विषयी डॉ सौ आशा चांडक यांनी मार्गदर्शन केले.अखेर सर्व उपस्थित महिलांना 2 महिने पुरतील इतके पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड मासिक पाळी व्यवस्थापन वर माहितीपत्रकचे मोफत वाटप करण्यात आले.

या प्रसंगी वाणटाकळी तांडा ग्रामस्थांची विशेषतः महिलांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशासाठी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, समुपदेशन डॉ सौ आशा चांडक,राजेश्वर वासलवार, ज्ञानेश्वर इक्कर, श्रीरंग पांडे, माणूस प्रतिष्ठान चे शरद झरे, गणेश जाधव, राठोड आणि सर्व वाणटाकळी तांडा ग्रामस्थांनी प्रयत्न केले.या प्रसंगी वाणटाकळी तांडा गावातील आशा सेविका, महिला व किशोरवयीन मुलींची मोठी उपस्थिती होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.