मेट गाला २०२१ मध्ये कलाकारांचा हटके अंदाज

मेट गाला हे जगातील प्रसिद्ध फॅशन डिझाईन प्लॅटफॉर्म आहे.यामध्ये वेगवेगळ्या देशातून सेलिब्रिटी हजेरी लावतात.

मेट गाला २०२१ मध्ये कलाकारांचा हटके अंदाज

मेट गाला हे जगातील प्रसिद्ध फॅशन डिझाईन प्लॅटफॉर्म आहे.यामध्ये वेगवेगळ्या देशातून सेलिब्रिटी हजेरी लावतात.यावर्षीच्या मेट गाला २०२१ ला सुरुवात झाली आहे. त्यात हॉलीवूडचे दिग्गज सहभागी झाले आहेत. आपल्या वेगळेपणासाठी या शो कडे पाहिले जाते. हटके अंदाज, वेशभूषा यासाठी गालाची वेगळी ओळख आहे.

एक आगळ्या वेगळ्या प्रकारची थीम घेऊन या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रेटी सहभागी झाले आहेत. त्यांचे कपडे पाहून चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही केल्या आहेत.यंदाच्या मेट गाला 2021 ची थीम ही "इन अमेरिका अ लेक्सिकॉन ऑफ फॅशन" ही आहे. त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

या सोहळ्यामध्ये वेगवेगळे सेलिब्रेटी सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. त्यात किम कार्देशिया, रिहाना, जेनिफर लोपेज, मेगन फॉक्स, बिली इलिश, नाओमी ओसाका यांचा समावेश आहे.सोहळ्यात सहभागी झालेल्या अनेक सेलिब्रेटींचा लूक त्यांच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय आहे. त्यांनी ते फोटो आपल्या सोशल मीडियावरुन व्हायरल केले आहेत.यासगळ्यात किम कार्देशियाच्या ड्रेसला सर्वाधिक कमेंट मिळाल्या आहेत.

तिनं बॅलेनसियागा नावाच्या ब्रँडच्या हेड टू टो ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसली आहे.त्यावरुन व्टिटरवर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स व्हायरल झाले आहेत. किमला हॅरी पॉटरमधील चेटकीन असेही म्हटले गेले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.