आजपासून मेट्रो-ग्रंथालय सुरु,मंदिर मात्र बंदच!

1 min read

आजपासून मेट्रो-ग्रंथालय सुरु,मंदिर मात्र बंदच!

मुंबई मेट्रो आजपासून सुरु मात्र शाळा-कॉलेज 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच!

मुंबई : मागील काही दिवसापासून मुंबईची लाईफलाईन असलेली मेट्रो रेल्वे सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. ‘अनलॉक-5’मध्ये सरकारने बार, रेस्टॉरंट, हॉटेल आणि मॉल यांना उघडण्यास सशर्त परवानगी दिली होती. मुंबईतआजपासून मेट्रो रेल्वे सुरु करण्यात येणार आहेत. त्याशिवाय,ग्रंथालये सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शाळा-कॉलेज मात्र 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. राज्य सरकारने आज जारी केलेल्या नव्या नियमावलीत धार्मिकस्थळे उघडण्याबाबतचे मात्रं कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.

सरकारने नविन नियमावली जारी केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील मेट्रो रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मागील काही दिवसापासून ग्रंथालये सुरु करण्याची विमंती केली जात होती. ती देखील सरकराने नवीन नियमावलीमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे.

मंदिर मात्र बंदच!

मागील काही दिवसापासून राज्यातील मंदिरे सुरु करण्याची मागणी केली जात आहे. भाजपने राज्यभार मंदिर उघडला आंदोलन सुरु आहे. सरकारने जारी केलेल्या नविन नियमावलीमध्ये मंदिर उघडण्याबाबतचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.