एमआयएम लातूर आणि मुक्तीसंग्राम

हैद्राबादचा एमआयएम पक्ष आणि लातूर यांच्यात गहिरे संबंध आहे. या पक्षाच्या जनकाची भूमी लातूर आहे, तर पक्षाची जन्मभुमी देखील लातूरच. मराठवाड्यातील लोकांवर प्रचंड अत्याचार करणाऱ्या क्रूरकर्मा रिझवी आणि रझाकारांच्या या संघटनेचे लातूरशी संबंध काय?

एमआयएम लातूर आणि मुक्तीसंग्राम

भारतीय स्वातंत्र्याचा लढा सुरू असताना हैद्राबादचा निजाम आपलं अस्तित्व कायम राखण्यासाठी धडपडत होता. कोणत्याही स्थितीत निजाम स्टेट कायम रहावे, त्याला स्वतंत्र देशाचा दर्जा असावा यासाठी निजामाचे प्रयत्न सुरू होते. निजामाच्या आदेशाने १९२७ साली नवाब महेबुब नवाज खान याने 'मजलीस'ची स्थापना केली. धार्मिक विषय पुढे करत निजामाचे सार्वभौमत्व अधोरेखीत करणे हेच या संस्थेचे ध्येय होते. १२ नोव्हेबर १९२७ हा मजलीसचा स्थापना दिवस. पुढे अकरा वर्षानंतर मजलीसची जबाबदारी बहादुर यार जंग याच्यावर आली. हा काळ १९३८ चा. हा बहादुर यार जंग म्हणजे मराठवाडा आणि हैद्राबाद परिसरातील क्रूरकर्माच म्हणायला हवा. त्याने संस्थानातील मुस्लीमेतर लोकांवर अनन्वित अन्याय-अत्याचार केले. एक प्रकारे छळाची परिसीमाच गाठली होती.

हा जी भाषणे देत असे त्यातून अनेक लोक प्रभावीत होऊन त्याच्या कट्टर संघटनेशी जोडली जात असत. आणि हा बहादुर यार गंज मजलीसच्या मराठवाड्यातील प्रवेशाचे कारण ठरला. मराठवाड्यातील सिमावर्ती भागाला लागून असलेल्या तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि आताच्या लातूर जिल्ह्यातील औसा इथं जन्मलेला एक तरूण प्रचंड प्रभावीत होऊन या संघटनेशी जोडला गेला. या तरूणाचे नाव कासिम रिझवी

आपल्या लातूरच्या राहत्या घरी कासिम रिझवीने मराठवाड्यातील मजलीसचे पहिले कार्यालय देखील सुरू केले. मजलीसचा प्रभाव आता वाढू लागला होता. मजलीसमध्ये मोठ्या संख्येने लोक जोडली जात होती. त्यासोबत बहादुर यार गंजचा प्रभावदेखील वाढू लागला. हा आपल्याला डोईजड ठरेल, अशी शंकादेखील निजामाला वाटत होती. संघटना हातात घेऊन जेमतेम पाच वर्ष पूर्ण झाली असतील, या बहादुर यार जंगचा विषारी हुक्का ओढल्याने मृत्यू झाला असे सांगितल्या जाते. त्याचा मृत्यू संशयास्पद होता. त्याच्या मृत्यूमागे निजामाचा हात होता. असे देखील म्हटले जाते. बहादुर यार जंगचा १९४४ साली मृत्यू झाल्यानंतर मजलीसची सगळी जबाबदारी लातूरच्या कासिम रिझवीच्या खांद्यावर आली.

पुढे रिझवीने किती अत्याचार केले याची कल्पना सगळ्यांनाच आहे. 'रझाकार' हा एक शब्दच त्या अत्याचाराची कहाणी मराठवाड्यातील लोकांना सांगून जातो. रझाकार ही कासिम रिझवीद्वारा उघडलेली मजलीसची सशस्त्र सैनिक आघाडी होती आणि हिच आघाडी जनतेवर प्रचंड अन्याय करत होती. मराठवाड्यातील हिंदू आया बहिणींची इज्जत, हिंदू परिवाराची संपत्ती आणि त्यांचे जीव सगळेच धोक्यात आले होते. आजही त्या भयावह कहाण्या वृध्दांच्या तोंडून ऐकताना शहारे उमटतात. रिझवीच्या सैन्यात माथी भडकाविले गेलेले (ब्रेन वॉश) लाखो मुस्लीम तरूण सहभागी होते.
IMG_20200730_112629

१९४७ साली देश स्वतंत्र झाला. देशातील ५६५ संस्थानांपैकी ५६२ संस्थाने विनाशर्त विलीन झाली होती. मात्र जी तीन संस्थाने विलीकरणास दाद देत नव्हती, त्यात काश्मीर, जुनागढ आणि हैद्राबाद संस्थानांचा प्रमुख होती. भारत स्वतंत्र झाला तरीही या तिन्ही संस्थानातील भारतीय नागरिक पारतंत्र्यातच होते. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा नाही तर निजामाचा असफजाही झेंडा फडकेल... बंगालचा उपसागर निजामाचे पाय धुवायला येईल. दख्खन पाकिस्तान निर्माण करू, अशी भाषा कासीम रिझवी वापरत होता. भारत स्वतंत्र झाल्यामुळे दक्षिणेकडील हैद्राबाद संस्थान भारतात सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांवर हल्ले केले जात होते. आज ओवेसी जी भाषा वापरतात तिचे मुळ या रिझवीच्या भाषेत आहे, हे आपल्या लक्षात येईल.
IMG_20190917_115025

भारतीय स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी मोठी कारवाई करत हैद्राबाद संस्थान अवघ्या कांही तासात भारतात विलीन करून घेतले. आणि रिझवीला अटक झाली. लाल किल्ल्यावर झेंडा फडकविण्याची भाषा करणारा तिरंग्याच्या नियंत्रणात असलेल्या येरवाडा कारागृहात बंदिस्त झाला. १९४९ साली एमआयएम ही संघटना बरखास्त करण्यात आली. पुढे कासिम रिझवी १९५७ पर्यंत तुरूगांत होता.
IMG-20200916-WA0005

१९५७ साली तुरुंगांतून सुटका झाल्यानंतर पाकिस्तानात पळून जाण्याआधी बरखास्त केलेल्या एमआयएमला पुन्हा एकदा जिवंत करण्याचे डावपेच रिझवीने आखले. याच डावपेचात पुन्हा एकदा लातूरचा संबंध आला. लातूर जिल्ह्यातील औसा या गावचा म्हणूनच ओवेसी नाव मिळाले. अब्दुल वहिद ओवेसी हा त्या काळात हैद्राबादमध्ये स्थिरावला होता. १९५७ साली या अब्दुल वहिद ओवैसीच्या हातात एमआयएमची धुरा सोपवली आणि पुन्हा एकदा लातूरचा एमआयएमशी संबंध आला. हा संबंध पुढे तीन पिढ्यापर्यंत कायम राहिला. पुढे १९७० साली पाकिस्तानात पळून गेलेला कासीम रिझवी नावाचा क्रूरकर्मा मयत झाला.

अब्दुल वहिद ओवैसी नंतर त्यांच्या मुलगा सुलतान सलाउद्दीन ओवेसी या रझाकाराच्या संघटनेचा अध्यक्ष झाला. आणि त्यानंतर आजचे ओवेसी अर्थात हैद्राबाद लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधी 'बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी' हे ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन या पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते लोकसभेवर सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत.
IMG-20200916-WA0006

रझाकारांची असलेली ही संघटना त्यावेळी भारताविरोधात सशस्त्र लढा लढत होती. ती मराठवाड्यातील हिंदूवर अन्याय करत होती. तिच संघटना आज आपल्या नावात ऑल इंडिया हा शब्द वाढवून राजकीय सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न करत आहे.

तेलंगणा विधानसभेत सात आमदार, बिहार विधानसभेत एक आमदार, महाराष्ट्र विधानसभेत दोन आमदार, लोकसभेत दोन खासदार आणि अनेक महानगर पालिकात प्रभावी संख्या त्यात औरंगाबादमध्ये प्रमुख विरोधी पक्ष अशी मजल आयएमआयला मारता आली आहे. हाच पक्ष एकेकाळी 'दक्षिण पाकिस्तान'चे स्वप्न पाहत होता हे कसे विसरता येईल...?


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.