राज्यात मिनी लाॅकडाऊन ?

सरकारने काही दिवसांपूर्वी संचारबंदी लावली होती, मात्र कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही. म्हणुन राज्यात मिनी लॉकडाऊन लावण्यात येऊ शकते...

राज्यात मिनी लाॅकडाऊन ?

मुंबईः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्येत देखील वाढ होत आहे. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलावली आहे. या बैठकीत लाॅकडाऊन संदर्भात मोठा निर्णय होणार असुन याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी संचारबंदी लावली होती, मात्र कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही. म्हणुन मिनी लॉकडाऊन लावण्यात येऊ शकते.

राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना जनतेत लॉकडाऊनची धास्ती कायम आहे. गेल्या वर्षभराच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यात महाराष्ट्रात कोरोना आकड्यांनी नवा उच्चांक गाठला. जवळपास ६.६ लाख कोरोनाग्रस्त आढळून आले असून तब्बल ४०% वाढ फक्त एका महिन्यात नोंद झाली आहे.

राज्यातील मोठ्या उद्योगपतींपासून ते हातावर पोट असलेल्या गोर गरीब मजुरांपर्यंत अशा सर्व स्तरातून लॉकडाऊनच्या विरोधात सूर आवळलेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनला पर्याय म्हणून कडक निर्बंधांसह 'मिनी लॉकडाऊन' चा विचार सध्या सरकार करत आहे. असे सुत्रांकडून समजले आहे.

कसा असणार मिनी लॉकडाऊन

  • सध्या राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीची वेळ वाढवून संध्याकाळी ७ ते सकाळी ८ पर्यंत करण्याचा विचार आहे. या वेळेतच दुकाने, हॉटेल, बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी असेल.

  • एकाच परिसरातील दुकाने दिवसाआड सुरू ठेवण्याचा विचार. एका गल्लीत एका रांगेतील सर्व दुकाने एका दिवशी सुरू राहतील तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रांगेतील सुरू असतील.

  • सर्वात जास्त फूट फॉल म्हणजेच गर्दीची ठिकाणे जसे मॉल, थिएटर्स, धार्मिक स्थळे, प्ले ग्राऊंडस, गार्डन्स आणि पिकनिक पॉईंट्सवर पूर्णपणे बंदी घालण्याची शक्यता आहे. संकर्मनाचे केंद्र असलेल्या या ठिकाणांवर प्रशासन कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे.

  • सर्व खाजगी ऑफिसेसना पुढच्या काही काळापुरते 'वर्क फ्रॉम होम' अनिवार्य करण्याचा विचार आहे. तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये रोटा पद्धतीने किंवा कमीत कमी क्षमतेने सुरू ठेवण्याच्या पर्यायाची चाचपणी सुरु करणार.

  • सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन पूर्णपणे बंद करण्याबाबत अद्याप कोणताही विचार नाही. पण लोकल मध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना परवानगी देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे.

लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय-राजेश टोपे
लॉकडाऊन ही प्रक्रिया कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महत्त्वाची... लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय ठेवला आहे. पण परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर ते करावे लागू शकते.

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.