महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी मंत्री छगन भुजबळ दोषमुक्त

मंत्री छगन भुजबळ कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाकडून दोषमुक्त.

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी मंत्री छगन भुजबळ दोषमुक्त

मुंबई : कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना क्लीन चीट मिळाली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भुजबळ यांची दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणातून मुक्तता करण्यात आली आहे.

आपल्यावर करण्यात आलेले आरोप निराधार आहेत त्यामुळे आपल्याला या प्रकरणातून दोषमुक्त करावे, अशी विनंती छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी एसीबी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान याआधीच एसीबीने याच महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील पाच आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या काळात महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर होता. विविध कंत्राटाच्या माध्यमातून छगन भुजबळ यांना लाखो रुपये लाच म्हणून देण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणी सक्तवसुली संचलनालयानेही छगन भुजबळांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणी सत्र न्यायालयाने छगन भुजबळांना दोषमुक्त केल्याने त्यांना हा एक मोठा दिलासा आहे.

कोणाकोणाची नावं वगळली?
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकण कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ, तनवीर शेख , इरम शेख , संजय जोशी , गीता जोशी , पीडब्ल्यूडी सचिव गंगाधर मराठे यांचं नावही महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून वगळण्यात आलं आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.