राज्यमंत्री बच्चु कडु पुन्हा विलगीकरणात

ताप व अंगदुखी असल्याने Rapid Antigen Test केली ती निगेटिव्ह आली आहे.

राज्यमंत्री बच्चु कडु पुन्हा विलगीकरणात

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच ठाकरे सरकारने राज्यात रात्रसंचारबंदी लागु केली आहे. तर अनेक शहरात लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. काही दिवसापुर्वी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडु यांना दुसऱ्यांदा कोरोना होऊन गेला आहे. आता पुन्हा प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

माझी प्रकृती ठिक नसल्यामुळे पुढील ३ दिवस कृपया कोणीही न विचारता भेटायला येऊ नये. ताप व अंगदुखी असल्याने Rapid Antigen Test केली ती निगेटिव्ह आली आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम आवश्यक असल्यामुळे पुढील काही दिवस मी विलगीकरणात आहे.असं ट्वीट राज्यमंत्री बच्चु कडु यांनी केल आहे.

राज्यात कोरोना रुग्ण संख्याची संख्या रोखण्यासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. राज्यात रविवार पासुन रात्री ८ ते पहाटे ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. हा निर्णय १५ एप्रिल पर्यत लागु असणार आहे. राज्यात गेल्या २४ तासा मध्ये ३५,७२६ नवीन कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत. तर १६६ जणांचा मृत्यृ झाला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.