यामुळे बनली मिस ग्रेट ब्रिटेन २०२०

1 min read

यामुळे बनली मिस ग्रेट ब्रिटेन २०२०

लठ्ठपणामुळे तिच्या मंगेतरनेही सोडले होते. परंतु जेन यामुळे खचली नाही, उलट तिला प्रेरणा मिळाली आणि आज ती 'मिस ग्रेट ब्रिटन २०२०' आहे.

लठ्ठपणामुळे बर्‍याचदा लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ब्रिटेनची राहणारी जेन एटकिनही त्यापैकीच एक होती. तिला लठ्ठपणामुळे तिच्या मंगेतरनेही सोडले होते. परंतु जेन यामुळे खचली नाही, उलट तिला प्रेरणा मिळाली आणि आज ती 'मिस ग्रेट ब्रिटन २०२०' आहे.

एका अहवालानुसार, दोन वर्षांपूर्वी जेनचे वजन १०९ किलो होते, परंतु मंगेतर सोडून गेल्यानंतर तिने जिममध्ये प्रवेश केला आणि कठोर परिश्रम केले. यासोबतच तीने आपल्या आहारावरही नियंत्रण ठेवले. दोन वर्षांत तीने सुमारे ४६ किलो वजन कमी केले. मंगेतर व्यतिरिक्त, जेनला वजन कमी करण्यास प्रवृत्त करणारी आणखी एक गोष्ट ती होती तिचा आवडता ड्रेस, जो तीला व्यविस्थत येत नव्हता.

वजन कमी झाल्यानंतर २६ वर्षीय जेनने 'मिस ग्रेट ब्रिटन २०२०' या स्पर्धेत भाग घेतला आणि जेतेपद जिंकले. ती म्हणाली की, तिने ही स्पर्धा जिंकली यावर तीला अजूनही विश्वास बसत नाहीये कारण यापुर्वीही २०१७ साली जेनने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तर २०१८ मध्ये ती उपविजेती ठरली.

जेन लिनकोलनशायरच्या अल्केबी शहरातील आहे. तिचे म्हणणे आहे की, ती आठवड्यातून पाच वेळा जिममध्ये जाते. यामुळे हा तीच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे. ती अजूनही आपल्या आवडीच्या गोष्टी खाते. परंतु त्यावर तीचे नियंञणही असते .

जेन सोशल मीडियाचा व्यापक वापरही करते. इन्स्टाग्रामवर तीचे पाच हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. जेनिफरने आपल्या या यशातून हे सिद्ध केले आहे की, आपण काहीतरी करण्याचा निर्धार केला असेल तर काहीही अशक्य नाही.