आ.ईश्वर खंड्रे यांना न्यायालयाने ठोठावला पाच लाखांचा दंड

1 min read

आ.ईश्वर खंड्रे यांना न्यायालयाने ठोठावला पाच लाखांचा दंड

न्यायालयीन अवमान प्रकरणी बंगळुरू उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाचे न्यायाधिश कृष्णा दिक्षीत यांनी ईश्वर खंड्रे यांना बुधवारी (ता.१८) रोजी पाच लाखांचा दंड ठोठावला.

महेश हुलसूरकर / हुलसूर : बिदर जिल्ह्यातील भालकी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार ईश्वर भीमन्ना खंड्रे यांच्या विरोधात २०१८ मधील विधानसभा निवडणुक संदर्भात भाजपाचे प्रतिस्पर्धी उमेदवार डी. के. सिद्राम यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. डी.के. सिद्राम यांनी दाखल केलेल्या याचिकेत ईश्वर खंड्रे यांनी निवडणुकीच्या तोंडावर लोकांना आमिष स्वरुपात चाळीस हजार स्वत:ची फोटो असलेल्या भिंतीवरील घडाळ्यांचे वाटप, शासकीय असलेली घरकुल योजना ही स्वत:च्या नावे असल्याचे तीस हजार बोगस प्रमाणपत्रांच्या वाटपा आधारे ९४ कोटींचा अपहार झाल्याचा आरोप त्यात करण्यात आला होता. या खटल्या संदर्भात एकही सुनावणीस ईश्वर खंड्रे यांनी उपस्थित न राहिल्याने न्यायालयीन अवमान प्रकरणी बंगळुरू उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाचे न्यायाधिश कृष्णा दिक्षीत यांनी ईश्वर खंड्रे यांना बुधवारी (ता.१८) रोजी पाच लाखांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम ८ दिवसांत कर्नाटक मुख्यमंत्री कोविड १९ सेंटरमध्ये भरण्याचे आदेश दिले व यापुढील होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या.न्यायालयाच्या या कार्यवाहीबध्दल कर्नाटक राज्य ऊस उत्पादक संघाचे भाजपा नेते डी.के. सिद्राम यांनी समाधान व्यक्त करुन यापुढील काळातही खंड्रे यांच्या विरोधात कायदेशीर लढा तीव्र स्वरुपाचा राहणार असल्याचे सांगून बिदर येथे ५ नोव्हेंबर रोजी ईश्वर खंड्रे यांनी याच प्रकरणावरुन लोकांना एकत्रीत करुन पळ काढण्याचा प्रयत्न केला होता.