आ.संजय शिरसाठ उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल.

1 min read

आ.संजय शिरसाठ उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल.

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांना पोटदुखीच्या त्रासामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात गुरूवारी सकाळी दाखल करण्यात आले आहे.

सुमित दंडुके / औरंगाबाद.दि.३० : शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांना पोटदुखीच्या त्रासामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात गुरूवारी सकाळी दाखल करण्यात आले आहे. संजय शिरसाठ यांना पोटाच्या (हर्निया) आजाराने अस्वस्थ वाटत होते.
याबद्दल स्वतः आ.शिरसाठ यांनी माहिती दिली , पोटाचा त्रास होत असल्यामुळे मी आज उपचारासाठी मुंबई येथील लीलावती हॉस्पिटल मध्ये दाखल झालो आहे. माझी प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुढील काही दिवस आपल्याला भेटू शकणार नाही. थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्या सेवेत असेल.
येत्या शनिवारी लिलावती हॉस्पिटलमधील डॉ. नरेंद्र मेहता हे हर्निया या आजाराचे ऑपरेशन करणार असल्याचे संजय शिरसाठ यांनी कळविले आहे. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते पुढील काही दिवस नागरिकांना भेटू शकणार नाही तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि निकटवर्तीयांनी काळजी करू नये. आमदार संजय शिरसाट हे लवकर बरे होऊन आपल्याशी सवांद साधतील असं देखील आवाहन त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलं आहे.