एमएलसी विजयसिंग यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री धरमसिंग याचे चिरंजीव एमएलसी बिदर विजयसिंग यांनी तगलुर, हाल्लाळी, हुलसूर, कोंगळी ब्रिज व जामखंडी पुलाला भेट दिली.

एमएलसी विजयसिंग यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट

** हुलसूर /एम.एस.हुलसूरकर **: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री धरमसिंग याचे चिरंजीव एमएलसी बिदर विजयसिंग यांनी तगलुर, हाल्लाळी, हुलसूर, कोंगळी ब्रिज व जामखंडी पुलाला भेट दिली. तसेच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे अश्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर एकरी पन्नास हजार रुपये मदत करावी अशी मागणी केली आहे. सर्वात जास्त प्रमाणात बिदर जिल्ह्यात पाऊस झाल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांना त्यांचे सोयाबीन गंजी वाहून गेलेले व तुर ऊस हे भुईसपाट झालेले पाहून दुख होत आहे. तसेच जामखंडी पुल हा एकमेव हैद्राबाद-लातूर महामार्ग क्र.७५२ वरील पुल आहे. हा पुल पुर्णतः खचला आहे याचीही यावेळी यांनी पाहणी केली.
यावेळी ता.अ.निलकंठ राठोड, रवी बोरुळे, दाऊद, अणवर वकील, युवराज भेंडे, संतोष गुत्तेदार, रणजीत गायकवाड, त्रिमुख जिवाई, विवेक चाळकापुरे, विष्णु पाटील, रामराव मोरे, विद्यासागर बनसोडे आदी उपस्थित होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.