शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मनसे आक्रमक, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

मनसेकडुन धरणे आंदोलन...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मनसे आक्रमक, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

औरंगाबाद : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनाम्याच्या सोपस्कार पार न पाडता शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत त्वरीत करावी. अशी मागणी मनसेकडुन करण्यात आली आहे. आज औरंगाबादेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मनसेने धरणे आंदोलन केले.

यावेळी जागरण गोंधळ घालून झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जागरण गोंधळ घालत हे आंदोलन सुरु होते. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. तसंच मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे, प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर, अशोक तावरे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, शहराध्यक्ष सतनाम गुलाटी, यासह आदी पदाधिकारी- कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.