मनसेचे शहराध्यक्षवर गंभीर आरोप करत पत्नीकडूनच गुन्हा दाखल

मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणे या कलमांखाली गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मनसेचे शहराध्यक्षवर गंभीर आरोप करत पत्नीकडूनच गुन्हा दाखल

नवी मुंबई : मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांच्या पत्नी संजीवनी काळे हिने गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. नेरुळ पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानसिक आणि शारिरीक छळ करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे या कलमांखाली गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या काही वर्षापासुन गजानन काळे आपल्याला माराहण करीत असुन जातीवाचक शिविगाळ करीत असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. त्याचबरोबर गजानन काळे यांचे बाहेरील महिलांशी संबंध असल्याने आपल्यावर घरात अन्याय करीत अल्याचाही आरोप पत्नीने नोंदवलेल्या FIR मध्ये केला.

गजानन काळे यांच्यावरती गंभीर आरोप
मनसेचे नेते गजानन काळे यांचे परस्त्रीयांसोबत अनैतिक संबंध असल्याचं अनेक वेळा माझ्या निदर्शनास आलं आहे. त्याला येणारे फोन कॉल, मेसेजवरुन ते लक्षात येतं. मी त्याला वारंवार समजून सांगायचे, पण माझ्या काही पत्रकार मैत्रिणी आहेत. तू याच्यात लक्ष घालू नको, असं म्हणून तो मला मारहाण करायचा, असंही गजानन काळे यांच्या पत्नीने पोलिस तक्रारीत म्हटलं आहे.

२००८ मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरच्या काहीच दिवसांत आमच्यात भांडण सुरु झालं. तेव्हापासून आमच्यात वारंवार खटके उडतात. तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे. तुझ्याशी लग्न करुन माझा काही एक फायदा झाला नाही… तुझ्या वडिलांची पोस्ट बघून मी तुझ्याशी लग्न केलं, असेही गंभीर आरोप गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्यावर केले आहेत.

माझ्या मुलाच्या हक्कासाठी मी हा निर्णय घेतला असून हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी १३ वर्ष गजानन काळेंसोबत संसार केला. या वर्षांत मी प्रचंड मानसिक, शाररिक त्रास सहन केला. माझ्या मुलालासुद्धा या गोष्टीचा त्रास होत होता. त्यामुळं मला हा निर्णय घेणे गजानन काळेंनी भाग पाडले आहे, असं गजानन काळे यांच्या पत्नीनं म्हटलं आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.