मुंबई: मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल सुरू करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काल 'सविनय कायदेभंग' करत आंदोलन केलं. रेल्वे पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना नोटिस बजावली होती. मात्र ही नोटीस झुगारून संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे यांनी गनिमी कावा करत रेल्वे प्रवास केला होता.
मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे यांना अटक करण्यात आल्याची बातमी टिव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीने दिली आहे. कर्जत पोलिसांत त्यांच्यावर रेल्वे अधिनियम 147,153,156 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांना आता कल्याण रेल्वे कोर्टात नेलं जाणार आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक.
मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे यांना अटक करण्यात आली आहे. कर्जत पोलिसांत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Loading...