मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्स कंपन्यांना चिनी उपकरणं काढण्याचे आदेश

1 min read

मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्स कंपन्यांना चिनी उपकरणं काढण्याचे आदेश

चिनी दुरसंचार उपकरणांवर बंदी, केंद्र सरकारचा निर्णय हा निर्णय दोन देशातील तणावामुळे घेण्यात आला आहे.

नवी दिल्लीः भारत सरकराने चिनी वस्तुनां भारतातून बाहेर काढण्याची तयारी केली आहे. सरकारने दुरसंचार उपकरणांवर बंदी घातण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्सला चिनी उपकरणं हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जूने टेंडर रद्द करुन नवीन टेंडर जारी करा, ज्यात चीन कुठंही नसेल अशा प्रकारचे आदेश सरकारीने दुरसंचार कंपन्यांना दिले आहेत. भारत सरकारने दुरसंचार विभाग, बीएसएनएलला आदेश द्यात सरकारी 4 जी संत्रणेत चीनी उपकरणांचा वापर तात्काळ बंद करण्यास सांगितलं आहे.

दुरसंचार विभागात 4 जी कार्यान्वीत करण्यास उपयोगात येणारी चीनी उपकरणं जी वापरात आहेत किंवा नाहीत, त्यांचा वापर तात्काळ बंद करावा, असं सरकारनं म्हटलंय. चीनला भारतीय बाजारातून हद्दपार करण्याची मोहीम देशभारात सुरु झाली आहे. देशभारात नागरिक देखील चिनी वस्तूंची होळी करताना दिसत आहेत. यातच सरकारचे दुरसंचार क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी कंपन्यांना चिनी उपकरणं वापर-खरेदीवर बंदीचे आदेश दिले आहेत. नव्या शर्थीसह सरकारी टेंडरमधून चिनी कंपन्यांना बाहेर ठेवणार असल्याची माहिती आहे. इतर खाजगी मोबईल कंपन्यांनाही चिनी उपकरण्याचा वापर कमी करण्यात करण्यास सांगण्यात येणार आहे.
हुवाई आणि जेटी या दोन चिनी कंपन्यांवर जगातील डेटा चोरी केल्याचा आरोप आहे. या कंपन्यांवर जगातील डेटा सुरक्षेच्या दृष्टीने याआधीच प्रश्न उपस्थित झाले होते. या दोन कंपन्याच्या मालकी हक्कांवर देखील शंका घेतल्या जात होती. या दोन कंपन्यांच्या मागे चीन सरकारचा हात असल्याचे बोलले जाते.
भारताचे परराष्ट्र खात्यानं चीनला तीव्र शब्दात सुनावलं आहे. गलवान व्हॅलीमध्ये जे काही झालं, तो पुर्वनियोजित आणि रणनिती आखून झालेलं आहे. भाविष्यात जे काही घडेल त्याला चीनच जबाबदार असेल, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय आहे.