"त्या"कुटुंबाला मदत करण्याची युवासेनेचे मोकाशे यांची मागणी.

1 min read

"त्या"कुटुंबाला मदत करण्याची युवासेनेचे मोकाशे यांची मागणी.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल!

सिध्देश्वर गिरी/परभणी: मागील पाच दिवसापूर्वी विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसात कान्हेगाव येथील दहा वर्षीय बालक लक्ष्मण गोविंद दुगाने याचा मृत्यू झाला होता. मात्र प्रशासनाने अद्यापही त्या कुटुंबाची व्यथा जाणून त्यांना आर्थिक मदत केली नसल्याने, त्या कुटुंबाला मदत करण्याची मागणी युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली होती.
सदरच्या निवेदनाची दखल मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ घेण्यात आली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाचे मुख्यसचिव किशोरराजे निंबाळकर यांनी येत्या आठ दिवसात मदत करणार असल्याची माहिती देत, परभणी जिल्ह्याची आकडेवारीच कथन केली यात जिल्ह्यात २० जनावरे व सहा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या सहा ही मयतांचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला असल्याचे सांगत "त्या"कुटुंबांना मदत करने गरजेचे असल्याच्या मताचा मी आहे.त्यामुळे येत्या आठ दिवसात सदर प्रकरणी मदत करणार असल्याचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.

युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे 

शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास मदत करु - तहसीलदार बिरादार
सदरच्या घटनेचा अहवाल प्राप्त झाला आहे. मागील सहा महिन्यापासून शासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाचा निधी आलेला नाही. निधी प्राप्त होताच त्या कुटुंबाला मदत देणार असल्याचे तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांनी सांगितले.