अपघाताला आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षेवर अधिक भर- अनिल परब

लोकांना अधिक सुलभपणे कशा सुविधा दिल्या जातील यावर लक्ष केंद्रीत करणार...

अपघाताला आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षेवर अधिक भर- अनिल परब

औरंगाबाद : वाढत्या रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षेवर अधिक भर देणे आवश्यक आहे. रस्त्यावरुन वाहन चालविताना वाहनचालकांना शिस्त लावणे महत्त्वाचे आहे, अशी सूचना परिवहन, संसदीय कार्य मंत्री ॲड.अनिल परब यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित औरंगाबाद, नांदेड व लातूर परिवहन विभागाच्या कामाकाजाचा परब यांनी सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. परब म्हणाले की, शासनाला चांगले उत्पन्न देणारे खाते म्हणून परिवहन विभागाची ओळख आहे. सक्षम अधिकाऱ्यांमुळे दिलेले उदिष्ट वेळेत पूर्णही केल्या जाते. या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या ११५ सेवांपैकी ८५ सेवा ऑनलाईन करण्यात आल्या, ही निश्चितच कौतुकाचे बाब आहे. यापुढेही लोकांना अधिक सुलभपणे कशा सुविधा दिल्या जातील यावर लक्ष केंद्रीत करण्याबरोबरच हा विभाग अधिक कार्यक्षम करण्यात यावा.

वाढत्या रस्ते अपघाताबद्दल चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, रस्ते अपघातात घट होण्यासाठी वाहनचालकांना शिस्त लावणे अधिक गरजेचे आहे. अपघात प्रवण क्षेत्राकडे गांभीर्याने लक्ष दयावे. ऑटोरिक्षा परवाना धारकांना जाहिर केलेल्या सानुग्रह अनुदान वाटपाबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना यावेळी त्यांनी केली. लोकांना देण्यात येणाऱ्या सेवा वेळेत मिळण्यासाठी कामाचे व्यवस्थित नियोजन करावे, अशी सुचनाही त्यांनी केली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.