धनगर समाजातर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन

1 min read

धनगर समाजातर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन

धनगर समाजतर्फे, केबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या निवासस्थानापासून ते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानापर्यंत विविध मागण्यांसाठी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.

सुमित दंडुके / औरंगाबाद.दि.२२ : शहरातील धनगर समाजतर्फे, केबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांच्या निवासस्थानापासून ते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या  जालना येथील निवासस्थानापर्यंत विविध मागण्यांसाठी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. राज्यातील धनगर समाजाला घटनेने दिलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची अंमलबजावणी करावी या करिता हे आंदोलन करण्यात आले. आजपासून या आंदोलनाद्वारे धनगर समाज आरक्षणासाठी रणशिंग फुंकत आहे. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन सूरूच आहे. आमच्या मागण्यांसाठी राज्य सरकारने तातडीचे  पाऊल न उचलल्यास जय मल्हार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनावेळी पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता