काँग्रेसमध्ये बदलाच्या हालचाली? पटोले दिल्ली दरबारी

उत्तर महाराष्ट्राचा दौरा अर्धवट सोडून, नाना पटोले यांना तातडीने दिल्लीत बोलावले

काँग्रेसमध्ये बदलाच्या हालचाली? पटोले दिल्ली दरबारी

मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आपला दौरा अर्धवट सोडून उद्या तातडीने दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळतेय. उत्तर महाराष्ट्राचा दौरा अर्धवट सोडून नाना पटोले आज दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभा अध्यक्षपद, स्वबळाच्या मुद्द्यांबाबत दिल्लीत वरिष्ठांसोबत चर्चेची शक्यता वर्तवण्याच येत आहे.

उद्या काँग्रेसची महत्त्वाची बैठक होत आहे. त्यामुळेच नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पटोलेंकडे उर्जा खात्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. नितीन राऊत यांच्याकडे असलेले उर्जा खाते नाना पटोलेंना मिळणार असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीत याबाबत काही निर्णय होणार का हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

५ जुलैला पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अद्याप विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित झाले नाही. येत्यापार्श्वभूमीवप पटोलेंना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावल्याचे कळतय.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.