लातूर : दि.19 ऑक्टोबर 2020 रोजी खासदार छत्रपती संभाजी राजे हे लातूर दौर्यावर येत असून लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकर्यांच्या पिकांची ते पाहणी करतील. यावेळी नुकसानग्रस्त शेतकर्यांशी ते संवाद साधणार आहेत. शेतकरी बांधवांच्या वेदना व दुःख जाणून घेवून त्या सरकार दरबारी मांडणार आहेत.
या दौर्यात छत्रपती संभाजी राजे निलंगा व औसा तालुक्यातील अतिवृष्टीनेग्रस्त असलेल्या गावांना भेटी देणार आहेत. राजे सकाळी 9 वाजता लातूर येथून निलंगा तालुक्यातील लिंबाळा गावाकडे प्रस्थान करणार आहेत. सकाळी 10.00 वाजता लिंबाळा गावातील शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. तेथून मदनसुरी, भुतमुगळी, बोरसुरी, कलमुगळी, मानेजवळगा, सावरी, माकणी, शिरसी आदि गावातील शेतकर्यांना भेटून संवाद साधणार आहेत.
या दौर्यात प्रा.सुधीर साळुंके, आशिष गायकवाड, उध्दव जाधव, ओम शिंदे, आशिष शिंदे, एम.एम.जाधव सर, उल्हास सुर्यवंशी, विनोद सोनवणे, कुमोद लोभे, योगेश शेंडगे, सुबोध गाडेवाल, डॉ.सचिन बसवदे, प्रमोद जाधव, बालाजी माने, धनंजय पाटील आदि. छत्रपती संभाजी राजेंसोबत सहभागी राहणार आहेत.