खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने दिवाळीपूर्वी घरकुलची रक्कम मिळणार

1 min read

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने दिवाळीपूर्वी घरकुलची रक्कम मिळणार

केंद्रसरकारचा एकूण ३ कोटी ३३ लाखाचा निधी खासदार हेमंत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला असून येत्या दोन दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे.

हिंगोली : शहरात नगरपालिकेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील ९५१ लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी परवानगी मिळाली असून केंद्रसरकारचा एकूण ३ कोटी ३३ लाखाचा निधी खासदार हेमंत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला असून येत्या दोन दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे. याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन पत्र दिले आणि मागणी केली होती.
dc
हिंगोली नगरपालिकने एकूण १०९८ पैकी ९५१ लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी परवानगी दिल्यानंतर त्यातील ४७० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु त्यातील शेवटचा हप्ता मिळाला नसल्याने सर्व कामे प्रलंबित राहिली होती. याबाबत खासदार हेमंत पाटील यांच्याकडे मतदार संघातून सर्वच नगर पंचायत आणि नगरपरिषदा अंतर्गत निधी प्रलंबित असल्याच्या तक्रारी येत होत्या. यावरून खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेऊन मतदार संघातील एकूण ९९ कोटीच्या प्रलंबित घरकुल कामाच्या निधीला मंजुरी देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आता केंद्रसरकारचा निधी टप्याटप्याने वाटप करण्यास सुरवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली नगर पालिकेअंतर्गत येणाऱ्या ९५१ घरकुलांचा डीपीआर मंजूर करून प्रत्यक्ष लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी घरकुलाचा हप्ता प्राप्त होणार आहे .
यापूर्वी कळमनुरी नगरपरिषद अंतर्गत २ कोटी २१ लाखाचा निधी मंजूर करून लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला आहे. तसेच किनवट नगर पालिके अंतर्गत निधि सुद्धा मंजूर करण्यात आला आहे. हिंगोली न.प अंतर्गत एकूण पाच डीपीआर मंजूर करण्यात आले आहेत .एकूण मंजूर करण्यात आलेल्या ९५१ घरकुलांपैकी २५७ घरकुल बांधकामे प्रगतीपथावर आहेत तर ४७० लाभार्थ्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. शहरी भागात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील व्यक्तीला स्वतःचे हक्काचे घर असावे या उद्देशाने प्रधानमंत्री शहरी आवास योजना राबविली जाते . हिंगोली न.प. अंतर्गत १०९८ घरकुलांना २७ कोटी ४५ लक्ष रुपयाचा केंद्र आणि राज्य सरकारचा निधी अपेक्षित असताना आजवर राज्यसरकाराचा १० कोटी ९८ लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे . याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला असून केंद्र ,राज्य आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांना याबाबत संपर्क साधून निधी तात्काळ मंजूर करावा अशी मागणी केली होती . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवालदिल झालेल्या सर्व सामान्य माणसाला घरकुल निधी प्राप्त झाल्याने दिलासा मिळाला आहे याबाबत हिंगोली शहरातील घरकुल लाभार्थ्यांनी खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले आहेत .