मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळुन आला आहे. मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोट सापडली असुन ती गुजराती भाषेत आहे. डेलकर यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.
**कोण आहेत मोहन डेलकर **
दादरा -नगरहवेली मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार होते. ५८ वर्षांचे डेलकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. १९८९ पासून ते या लोकसभा मतदार संघातून निवडून येत आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.