खासदार नवनीत राणा यांना उपचारासाठी मुंबईत हलविले.

1 min read

खासदार नवनीत राणा यांना उपचारासाठी मुंबईत हलविले.

श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी मुंबईला हलविले.

मुंबई: खासदार नवनीत राणा यांना 6 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण झाली होती. नवनीत राणा यांच्यावर काही दिवस घरीच उपचार सुरू होते. मात्र त्यांची तब्येत खालावली असता त्यांनी उपचारासाठी 11 ऑगस्टला नागपूरला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत.
आज त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याऩे पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलं आहे. त्यांच्यावर लिलावती रूग्णालयात उपचार केले जाणार आहेत. 2 ऑगस्टला आमदार रवी राणा, त्यांच्या मुलांना व सासू सासरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नागपूच्या वॉकहर्ट रूग्णालयात उपचार सुरू आहेत.