खासदार नवनीत राणा यांची प्रकृती स्थिर

1 min read

खासदार नवनीत राणा यांची प्रकृती स्थिर

मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार- खासदार नवनीत राणा

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून दिली. ‘ आज मला ICU मधून सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आले आहे, आता माझी प्रकृति थोड़ी स्थिर आहे, आपणा सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे, मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार.’ असल्याच त्यांनी म्हटलं आहे.
नवनीत राणा यांना 6 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण झाली होती. नवनीत राणा यांच्यावर काही दिवस घरीच उपचार सुरू होते. मात्र त्यांची तब्येत खालावली असता त्यांनी उपचारासाठी 11 ऑगस्टला नागपूरला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याऩे पुढील उपचारासाठी 13 ऑगस्टला मुंबईला हलवण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर लिलावती रूग्णालयात उपचार सुरू आहेत.