खासदार नवनीत राणा व रवी राणा यांच्या कुटुंबातील  10 जण कोरोनाग्रस्त

1 min read

खासदार नवनीत राणा व रवी राणा यांच्या कुटुंबातील 10 जण कोरोनाग्रस्त

रवी राणा यांच्या दोन्ही मुलांना कोरोना झाला आहे

वृत्तसंस्था /अमरावती : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्या कुटुंबातील 10 सदस्य कोरोना बाधीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.  थ्रोट स्वाब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे परिसर कंटेंटमेंट झोन घोषित करण्यात आला आहे.  घराबाहेर बॅरिकेटिंग करण्यात आले आहे, यात रवी राणा यांच्या दोन्ही मुलांना कोरोना झाला आहे
आमदार रवी राणा यांचे वडील गंगाधर राणा वय 72 वर्ष व आई सावित्रीबाई राणा वय 70 वर्ष  यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे  रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी वोकार्ट हॉस्पिटल नागपूर साठी गंगा सावित्री निवासस्थान शंकर नगर येथून रवाना करण्यात आले. आमदार रवि राणा हे स्वतः मातापित्यांसोबत नागपूर करिता रवाना झाले, कुटुंबातील इतर बाधित सदस्यांसह आमदार रवी राणा यांची कन्या वय ६ वर्ष, मुलगा वय ४ वर्ष हे पॉझिटिव्ह आल्यामुळे यांच्यासह इतर १० पॉझिटिव्ह सदस्य घरी  विलगिकरणात असून खासदार नवनीत राणा सर्व सदस्यांची जातीने काळजी घेत आहेत ,संपर्कात आलेल्या सर्वांनी आपल्या टेस्ट करून घ्याव्यात  व काळजी घ्यावी तसेच शासन निर्देशांचे पालन करावे असे आवाहन आमदार रवी राणा -खासदार नवनीत राणा यांनी केले आहे.