खासदार राजीव सातवांची रिक्षा सवारी..!

1 min read

खासदार राजीव सातवांची रिक्षा सवारी..!

हिंगोली बाजारपेठेत व्यापारी, नागरिकांच्या घेतल्या भेटी

प्रद्युम्न गिरीकर / हिंगोली : राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांनी आज हिंगोली शहरातील बाजारपेठेत फेरफटका मारून व्यापारी व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यादरम्यान गांधी चौकात उभ्या असलेल्या ई रिक्षामध्ये बसून त्यांनी सवारीचा देखील आनंद लुटला.
गेल्या दोन दिवसांपासून खासदार राजीव सातव हे हिंगोली शहरात विविध ठिकाणी भेटी देऊन नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. आज दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधी चौकामध्ये अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करून सातव यांनी शहरातील बाजारपेठेत फेरफटका मारला. यामध्ये व्यापाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा तर दिल्याच शिवाय चौकात बसणारे मजूर व हातगाडीवाले यांनाही शुभेच्छा दिल्या. यादरम्यान गांधी चौकात उभा असलेला ई रिक्षा पाहून त्यांचे कुतूहल जागे झाले. रिक्षाचालकाकडून संबंधित ई रिक्षाची माहिती घेतल्यानंतर सातव थेट रिक्षात बसले आणि चौकातून फेरी मारत त्यांनी प्रवासाचा आनंद लुटला.
rajiv-satav-2
यावेळी त्यांच्यासह बाबा नाईक, शहराध्यक्ष बापुराव बांगर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ, हिंगोली तालुका अध्यक्ष शामराव जगताप, माजी नगराध्यक्ष सुधिर सराफ, न.प गटनेते शेख नेहाल भैय्या, मा.जि.प सदस्य केशवराव नाईक, काँग्रेस प्रवक्ते विलास गोरे, डॉ.राजेश भोसले, न.प.सभापती माबुद बागवान, जि.प सदस्य सतिश पाचपुते, कैलाश साळुंके, एस.पी.राठोड, नामदेव बुद्रुक, माजी जि.प सदस्य ओम देशमुख, नगरसेवक आरेफ लाला, नगरसेवक मुजीब कुरेशी, बासीत मौलाना, नजीर पठाण, प्रभुअप्पा जिरवणकर, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष बंटी नागरे, अजय बांगर, शासन कांबळे, चंदु प्यारेवाले, दिपकसिंह गहिरवार, राजदत्त देशमुख, दत्ता भवर, आशिष पुडंगे आदी उपस्थित होते.