मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फेत येत्या रविवारी १४ मार्च रोजी राज्य सेवा पूर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र ही परीक्षा पुढे ढकलल्यामुळे राज्यतील विविध शहरात विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. दुसरकीडे युवक काॅग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी जाहीर निषेध केला आहे.
एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो.
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) March 11, 2021
करोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे ?
ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे.
एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे ? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे. असं ट्विट युवक काॅग्रेसचे सत्यजित तांबे यांनी केलं आहे.
