पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२० मध्ये आयोजित स्पर्धा परिक्षांचे सुधारित वेळापत्रक ७ सप्टेंबर २०२० च्या प्रसिद्धीपत्रकात जाहीर करण्यात आले होेते. त्यानुसार ११ ऑक्टोबर २०२० रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रस्तावित होती. पण सरकारने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ऐनवेळी घेतला. यासोबतच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षाही पुढे ढकलल्याचं प्रसिद्धीपत्रक १३ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलं होतं.
दरम्यान कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीत सरकारकडून वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षा आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून आढावा घेण्यात येईल. तसंच याबाबतची माहिती आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे उमेदवारांनी नियमित वेबसाईटवर भेट देणं उचित ठरेल, असं आयोगाने आपल्या प्रसिद्धपत्रकात म्हटलं आहे.
MPSC अखेर उत्सुकता संपली...!
ऑक्टोंबर महिन्यात ऐनवेळी रद्द करण्यात आलेल्या परीक्षा आता मार्च - एप्रिल २०२१ मध्ये होणार...

Loading...