MPSC ची नवीन तारखी जाहीर

मुख्यमंत्र्यानी दिले होते विद्यार्थाना आश्वासन

MPSC ची नवीन तारखी जाहीर

मुंबई : कोरोना संसर्गाचे कारण देत राज्यसेवा आयोगाने १४ मार्च रोजी होणारी परिक्षा पुढे ढकलली होती. आता ही परीक्षा २१ मार्च रोजी होणार असल्याच परीपत्रक राज्यसेवा आयोगाकडुन जारी करणात आले आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यामातुन शुक्रवारी तारीख जाहीर करणार असलेल्या आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दि. २१ मार्च २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूप्व परीक्षा २०२० च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थान प्रभाग, मदत व पुनरवसन विभागकडून दि. १० मार्च, २०२१रोजीच्या पत्राद्वारे प्राप्त सुचनांनुसार सदर परीक्षा आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती, प्रस्तुत परीक्षा दि. २१ मार्च २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. असे आयोगाकडुन सांगण्यात आले.

त्याबरोबर शनिवार दि. २७ मार्च २०२१ रोजी आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० तसेच रविवार दि. ११ ए्प्रिल २०२१ रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपित गट ब संयुक्त पूर्व परीक्षआ २०२० या दोन परीक्षा नियोजित तारखेला घेतल्या जातील. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. असे आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.