mpsc परीक्षा, परीक्षार्थी अशी घ्या काळजी

परीक्षा देताना उमेदवारांनी काय खबरदारी घ्यावी ? या विषय परिपत्रक जाहीर

mpsc परीक्षा, परीक्षार्थी अशी घ्या काळजी

मुंबईः कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आतापर्यंत राज्य सेवा पूर्व परिक्षा ५ वेळा समोर ढकलल्या होत्या, मात्र आता उद्या या परिक्षा होणार आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत चलला असुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या पुढील परीक्षेसाठी परीक्षार्थी उमेदवारांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही महत्वाच्या सूचना करण्यात आल्या आहे. या परीक्षा देताना उमेदवारांनी काय खबरदारी घ्यावी ? याबाबतचे परिपत्रक काल काढण्यात आले आहे.

यामध्ये उमेदवारांना दोन्ही सत्रासाठी मास्क ,हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझरचे किट देण्यात येणार असून त्याचा वापर उमेदवारांनी परीक्षा देताना करायचा आहे. सोबतच ज्या उमेदवारांना सर्दी, ताप किंवा करोना संबंधित लक्षणे आढळत असतील तर संबंधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षीय अधिकारी-कर्मचारी यांना तातडीने कळवावे लागणार आहे. अशा उमेदवारांची स्वतंत्र्य बैठक कक्षात व्यवस्था करण्यात येणार असून त्यांना पीपीई किट सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे

परिक्षा उमेदवाराना सुचना

  • परिक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करतांना किमान तिन पदरी कापडाचे मुखवटे परिधान करणे अनिवार्य आहे.

  • परिक्षा केंद्रा मध्ये मास्क ,हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझरचे किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता व आरोग्यास हितावह वातावरण राखण्यासाठी वेळोवेळी हॅन्ड सॅनिटायजरचा वापर कराणे आवश्यक.

  • कोवीड -19ची लक्षणे असल्यास जसे की सर्दी, ताप किंवा करोना संबंधित लक्षणे आढळत असतील तर संबंधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षीय अधिकारी-कर्मचारी यांना तातडीने कळवावे.त्याची स्वतंत्र्य बैठक कक्षात व्यवस्था करण्यात येईल.

  • परीक्षा उपकेंद्रातील माहिती फलक, सांकेतिक चिन्हे याचे कटाक्षाने पालन उमेदवारांना करायचे आहे.

  • परिक्षा संमल्यावर परिक्षा उपकेंद्रावर परस्पर अंतर राखणे अनिवाऱ्या आहे.

  • वापरलेले टिश्यु पेपर मुखपट , हातमोजे ,इ. वस्तु कंचरा कुंडीमध्ये टाकावेत.

  • उमेदवारांनी सोशल डिस्टंसिंग काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक असणार आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.