एमपीएससीच्या विद्यार्थ्याचा पुण्यात रस्तारोको

एमपीएससीच्या परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुढे ढकलल्यामुळे पुण्यात परिक्षार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.

एमपीएससीच्या विद्यार्थ्याचा पुण्यात रस्तारोको

पुणेः कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे . या पार्श्वभुमीवर रविवारी होणारी राज्यसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुढे ढकलल्यामुळे पुण्यात परिक्षार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. पुण्यातील नवी पेठे येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

पाचव्यांदा परिक्षा रद्द करण्यात आल्यामुळे पुण्यातील नवी पेठ येथे संतप्त राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलनाला सुरुवात केली. शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केले. विद्यार्थ्यांनी नवी पेठेतील दोन्ही रस्ते रोखून धरले होते. पोलिसांकडूनही विद्यार्थ्यांची धरपकड सुरु आहे. परीक्षेला अवघे तीन दिवस बाकी असताना अचानक परीक्षा पुढे ढकलल्यामुळे परीक्षार्थी नाराज झाले.

राज्य सेवा आयोगाची पुर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर
पाचव्यांदा ढकली परीक्षा पुढे

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.