महावितरणच करतय शहरास टार्गेट.

कोणतीही समस्या नसताना विजेचा खेळखंडोबा. समन्वय नसल्याने विद्युतपुरवठा खंडित-सदाशिव कोल्हेकर

महावितरणच करतय शहरास टार्गेट.

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ:सोनपेठ शहरासाठी महावितरण म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. संचारबंदीच्या नावाखाली महावितरण लोडशेंडीग करत असल्याचा आरोप होत असून. सोनपेठच्या महावितरणला अवकळा लागली आहे. असेच यावरुन दिसतेय मागील सहा महिन्यांपासून लागू करण्यात आलेल्या. कोरोना आजाराच्या संचारबंदीने सामान्य लोकांचे जीवनमान बदलले आहे. परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा रुग्ण वाढत असल्याने, व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळत कोरोना या आजारास हरवण्याचा चंग बांधला आहे.
यामुळे सर्व व्यापारी आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन घरी थांबत आहेत. मात्र महावितरणच्या मनमानी कारभारामुळे सोनपेठ शहर त्रस्त झाले आहे. तालुक्यातील परिस्थितीही यापेक्षा वाईट नसल्याचे यावरून दिसून येते. शहरात एकदा विद्युत पुरवठा खंडित झाला की,चार तास पाच तास येत नाही. यामुळे महावितरणला अभय कोणाचे? असा सवालही उपस्थित होत आहे. कामचुकार कर्मचारी आणि अभियंता यांच्या कार्यपध्दतीमुळे विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास वीज येत नसल्याचा आरोप शहरवासीयांनी केला आहे.
समन्वय नसल्याने विद्युतपुरवठा खंडित-सदाशिव कोल्हेकर
शहरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्यास कर्मचारी आणि अभियंते यांचा समन्वय कारणीभूत आहे. सद्या सोनपेठ शहराचा भार दोन ३३ के.व्ही.वर आहे. तरीही विद्युतपुरवठा खंडीत होत असून सद्या शाळा बंद असल्याने संगणक प्रणालीचा अवलंब करत विद्यार्थी घरी राहूनच अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. मात्र विद्युतपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शालेय अभ्यासावर परिणाम होत असल्याचे दिसते. हा सर्व प्रकार महावितरण विभागात समन्वय राहीला नसल्यानेच होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव कोल्हेकर यांनी सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.