उर्जा मंञ्याच्या आदेशालाच महावितरणचा खोडा

महावितरण प्रशासन मनमानी करीत बेकायदेशीररित्या उडण्याचे प्रकार तात्काळ थांबवावे.

उर्जा मंञ्याच्या आदेशालाच  महावितरणचा खोडा

निलंगा : शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन उर्जा मंञी नितीन राऊत यानी परिपञकाद्वारे शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडू नये. त्याअगोदर शेतकऱ्यांना नोटीस देणे बंधनकारक असल्याचा आदेशच दिला असताना सुद्धा महावितरणकडून विज तोडणी मोहिम सुरूच ठेवल्याने काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनीच शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा पञकार परिषद घेऊन दिला आहे.

यापुढे बोलताना निलंगेकर म्हणाले,महाराष्ट्र शासनाचे कृषी पंप थकबाकी वसुली धोरण शेतकरी पूरक असतानाही महावितरण प्रशासन मनमानी करीत बेकायदेशीररित्या उडण्याचे प्रकार तात्काळ थांबवावे. अन्यथा महावितरण प्रशासनाच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील. असा इशारा काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी अभय सोळुंके, विजयकुमार पाटील सुधाकर पाटील,अजगर अंसारी, राजप्पा वारद, अँड संदीप मोरे, अमोल सोनकांबळे, लक्ष्मण बोधले, सुरेंद्र महाराज कांबळे यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या विज बिल वरील थकबाकी वरील व्याजात १८ टक्के दंडव्याज कपात करून उरलेल्या जागेत ५० टक्के सूट दिली आहे. या योजनेत वसुली व जनजागृतीसाठी ग्रामपंचायत तिलाही सहभागी करून घेत याचे लाभ देण्याचे धोरण जाहीर केले आहे. वसूल झालेल्या रकमेतील ते तीस टक्के रक्कम त्याच गावातील कृषी पंप संदर्भातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करणे ते ३० टक्के रक्कम तालुका व जिल्ह्यातील मोठे पंप व सौर उर्जा संबंधित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या असल्याने शेतकरी हितासाठी खर्च करणे उर्वरित ३० टक्के रक्कम लवकर पगारासाठी वापरण्यासाठी नियम लागू केले आहेत. महाराष्ट्र वीज वितरण अधिकारी या योजनेची व ध्येयधोरणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचत नाही. ग्रामपंचायतीला ही सहभागी करून घेत नाही. रब्बी हंगामात रोहित रे बंद करत आहेत. याचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे म्हणून शासनाने कृषी ग्राहकाचे सुधारित थकबाकी सप्टेंबर दोन हजार वीस च्या बीजेपीला नुसार ठेवण्यात आले असून त्यावर कोणतेही व्याज किंवा विलंब लागणार नाही. सदर रक्कम भरण्यास ३१ मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ची सवलत मुदत देण्यात आली आहे शेतकऱ्यांचे बिलासंदर्भात शेतकऱ्यांची तक्रार असेल तर तक्रारीचे निवडणूक निवारण करूनच वसुलीची प्रक्रिया करावी वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांना कलम ५६ नुसार वीजपुरवठा खंडित करणे बाबत नोटीस न बजावता कुठलीही कारवाई करू नये. अशा सक्त सूचना महावितरण कंपनीने नवीन परिपत्रकानुसार दिले आहेत. तरीही गावोगावी महावितरणकडून कसली नोटीस न देता ग्रामपंचायतीला सहभागी न करून घेता वीज पुरवठा खंडित करण्याचे प्रकार सुरू असल्याने काँग्रेस पक्ष च्या वतीने काल पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर असणार असल्याचे व या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती अशोक पाटील निलंगेकर यांनी यावेळी दिली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.