मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबावर शोककळा

1 min read

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबावर शोककळा

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडिल माधव पाटनकर यांचे निधन झाले आहे. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. ते 78 वर्षाचे होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून बातमीला दुजोरा दिला आहे. उध्दव ठाकरे यांच्या पत्नी व रश्मी ठाकरे यांचे वडिल व्यवसायिक होते. रश्मी ठाकरे यांचे माहेर डोंबवली येथील आहे. माधव पाटनकर यांच्यावर येथील क्रिटिकेअर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते.

सुप्रिया सुळे यांनी पाटनकर आणि ठाकरे कुटुंबाच्या दुखा:त आम्ही सहभागी आहोत.अशी भावना व्यक्त करत श्रध्दांजली अर्पण केली आहे.