मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या बैठकीत CAA वर चर्चा?

1 min read

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या बैठकीत CAA वर चर्चा?

या बैठकीत काय चर्चा होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित आहेत. CAA ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यावर या बैठकीत चर्चा होते आहे अशी चर्चा आहे. तसंच अधिवेशनात काय काय करायचं याबाबतही चर्चा सुरु आहे असंही समजतं आहे. दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर CAA हा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे घेण्याचा नाही या कायद्याला घाबरण्याची गरज नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. हा विषय या बैठकीत चर्चिला जाण्याची शक्यता आहे.