ग्रामीण रुग्णालयाला पडला मुक्तीसंग्राम दिनाचा विसर.

1 min read

ग्रामीण रुग्णालयाला पडला मुक्तीसंग्राम दिनाचा विसर.

रुग्णालयातील जबाबदार कर्मचाऱ्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी .

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: सोनपेठ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयास मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा विसर पडल्याचे चित्र गुरुवार रोजी दिसून आले. तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठीक ठिकाणी सोशल डिस्टन्स ठेवून ध्वजारोहण कार्यक्रम पार पडले. मात्र तालुक्यातील आरोग्य सेवा पुरवणाऱ्या ग्रामीण रुग्णालयास मात्र या ध्वजारोहणाचा विसर पडला का? असा सवाल आता सोनपेठमध्ये उपस्थित केला जात आहे. सोनपेठ तालुका म्हणजे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असणारा तालुका आहे. या तालुक्याच्या विकासात्मक कामात मागील काही दिवसांपासून अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहिल्याने भर पडली आहे. मात्र या समन्वयाला ग्रामीण रुग्णालयाकडून विरजण घातल्या जात आहे.
WhatsApp-Image-2020-09-17-at-5.59.11-PM
मागील अनेक दिवसांपासून लागू असणाऱ्या, कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीत देखील दुर्लक्ष करण्याचे काम ग्रामीण रुग्णालयामार्फत चालू असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी परिश्रम घेत आहेत. यासोबतच तालुक्यातील महसूल प्रशासन,पोलीस प्रशासन,गटविकास अधिकारी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये न येता शिक्षकांनी सोशल डिस्टन्स ठेवून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसादही मिळाला. मात्र ग्रामीण रुग्णालयात ध्वजारोहण करण्यात आले नसल्याने रुग्णालयातील जबाबदार कर्मचाऱ्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. यासाठीचे निवेदन शिवसेनेने दिले असून आता येणारा काळच ठरवेल कार्यवाही होणार की? कामचुकार कर्मचाऱ्यांना पाठीशी घातल्या जाणार? निवेदनावर शहरप्रमुख कृष्णा पिंगळे,भगवान पायघन,जनार्दन झिरपे,अमरदीप नागुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.